शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

आश्चर्यच! ‘वनहक्क’चे अधिकारी नाशिकला, कार्यालय पुण्यात; आदिवासींच्या न्यायासाठी कार्यालय स्थानांतरणाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 18:05 IST

नाशिक येथून वनहक्क कायदा विभाग पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेत एप्रिल २०१८ मध्ये हलविण्यात आला.

- गणेश वासनिक

अमरावती : आदिवासींना सामूहिक वनहक्क मिळावे, यासाठी केंद्र शासनाने वनहक्क अधिनियमांच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली. मात्र, सद्यस्थितीत ‘वनहक्क’चे अधिकारी नाशिकला, तर कार्यालय पुण्यात आहे. त्यामुळे वनहक्काबाबत आदिवासींना न्याय मिळत नसल्याची ओरड आहे. नाशिक येथे कार्यालय स्थानांतरित करावे, अशी मागणी बिरसा क्रांती दलाने केली आहे.सध्या आदिवासींना सामूहिक वनहक्क देणारे कार्यालय पुणे येथे आहे. ते कार्यालय नाशिक येथे स्थानांतरित करावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ‘ट्रायबल’च्या  प्रधान सचिव विनिता सिंघल यांच्याकडे बिरसा क्रांती दलाने केली आहे.

आदिवासी भागात वनहक्क कायद्याची अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार नाशिक येथे आदिवासी विकास आयुक्तालयात स्वतंत्र वनहक्क कायदा विभाग सुरू करून कामही योग्य प्रकारे सुरू होते. अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम, २००६ व नियम, २००८ आणि सुधारित नियम, २०१२ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, प्रलंबित वनहक्क दावे व अपिले यांचा कालबद्ध निपटारा करण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडे स्वतंत्र जबाबदारी सोपविण्यात आली होती. 

नाशिक येथून वनहक्क कायदा विभाग पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेत एप्रिल २०१८ मध्ये हलविण्यात आला. मात्र, या कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने न झाल्याची बाब समोर आली. पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त यांच्या पत्रावर जिल्हाधिकारी व इतर तत्सम अधिकारी हे योग्य दखल घेत नाही.

वनहक्क कायद्याच्या बºयाच योजना या प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत राबविल्या जातात. या कारणास्तव  शासनाने १३ फेब्रुवारी २०२० रोजीच्या पत्रानुसार नोडल अधिकारी म्हणून पुन्हा टीआरटीआय, पुणे ऐवजी नाशिक येथील आदिवासी विकास विभाग आयुक्तांकडे जबाबदारी सोपविली आहे. मात्र, या पत्रावर अद्याप कार्यवाही झालेली नाही, असे निवेदनात नमूद आहे.

आदिवासींच्या वन्यजीवसंदर्भात प्रकरणे असतील, तर ती नाशिक येथील आयुक्तालयातून हाताळली जातात. अजूनही वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी ही पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडेच आहे.- किरण कुलकर्णी, आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक.

आदिवासी बांधव वनहक्कांपासून वंचित राहत आहेत. कायदा असूनही वनहक्कांचा लाभ मिळत नाही. वनहक्क न दिल्याने सर्वोच्च न्यायालयाने १३ फेब्रुवारी २०१९ रोजी आदिवासींना वनातून हुसकावून लावण्याचे आदेश दिले आहेत. नाशिक येथे वनहक्क कार्यालय स्थानांतरित होणे गरजचे आहे. - प्रमोद घोडाम, अध्यक्ष, बिरसा क्रांती दल.

टॅग्स :Amravatiअमरावतीforest departmentवनविभागMaharashtraमहाराष्ट्र