पंचम नाईटमध्ये सुरांचा वर्षाव
By Admin | Updated: June 28, 2016 00:18 IST2016-06-28T00:18:32+5:302016-06-28T00:18:32+5:30
शहनाई म्युजिकल ग्रुप व सिम्फनी म्युजिकल अकादमी व सखी मंचच्या संयुक्त विद्यमाने पंचम नाईटस्चा हा कार्यक्रम स्थानिक भोसले सभागृह विमवि येथे घेण्यात आला.

पंचम नाईटमध्ये सुरांचा वर्षाव
सामाजिकतेचे भाव : अमरावतीकरांनी घेतला गीतांचा आस्वाद
अमरावती : शहनाई म्युजिकल ग्रुप व सिम्फनी म्युजिकल अकादमी व सखी मंचच्या संयुक्त विद्यमाने पंचम नाईटस्चा हा कार्यक्रम स्थानिक भोसले सभागृह विमवि येथे घेण्यात आला.
यावेळी अजय लढ्ढा, बबनराव कोल्हे, दिनकर पांडे, ‘लोकमत’चे उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे, यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. शहरातील हौशी कलकाराची एकापेक्षा एक पंचमदा यांच्या गाजलेल्या गाण्यांची मेजवानी सखीमंच सदस्यांसाठी सादर केली. या सुरेल मैफलीसाठी सुरुवात प्रितम कलसकर (ये जमी गा रही है) या गाण्यापासून करण्यात आली तर जितेंद्र राजकुमार यांनी मेरे सामने वाली खिडकी मे, चंद्रकांत पोपटकर यांनी सुहानी चांदणी राते, नम्रता पाटील यांनी आओ ना गले लगजावो ना यासारख्या गाण्यांनी प्रेक्षकांचे मन मोहून टाकले. सजीन गुडे व साऊंड व्यवस्थापक रफीक भाई यांच्या संगीतांनी प्रेक्षकांना थिरकायला भाग पाडले. आदी अनेक सदाबहार गीते सादर करण्यात आली. हा कार्यक्रम नि:शुल्क होता. या कार्यक्रमातून मिळालेले सामाजिकतेचे भाव सदाशांती अनाथ आश्रमाला २४ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आले. (प्रतिनिधी)