सुरेखा ठाकरे पुन्हा राष्ट्रवादीत
By Admin | Updated: October 27, 2016 00:10 IST2016-10-27T00:10:04+5:302016-10-27T00:10:04+5:30
राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेशकर्त्या झालेल्या सुरेखा ठाकरे यांनी बुधवारी मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.

सुरेखा ठाकरे पुन्हा राष्ट्रवादीत
चांदूरबाजार : राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेशकर्त्या झालेल्या सुरेखा ठाकरे यांनी बुधवारी मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.
विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. परंतु निवडणुकीनंतर त्या पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेशासाठी इच्छुक होत्या. मात्र, यासाठी त्यांना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली. अखेर त्यांनी राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. सुरेखा ठाकरेंच्या या राकाँ प्रवेशाचे अचलपूर मतदारसंघात अनेक अन्वयार्थ काढले जात आहेत. (तालुका प्रतिनिधी)