‘सूर राइझिंग स्टार्स’, गायकांना पर्वणी
By Admin | Updated: January 23, 2017 00:12 IST2017-01-23T00:12:03+5:302017-01-23T00:12:03+5:30
कलर्स व लोकमत सखीमंचद्वारे २५ जानेवारीला स्थानिक अभियंता हॉल, शेगाव नाका चौक, अमरावती येथे दुपारी ४.३० वाजता ‘सूर राइझिंग स्टार्स’चे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

‘सूर राइझिंग स्टार्स’, गायकांना पर्वणी
२५ जानेवारीला स्पर्धा : कलर्स, लोकमत सखीमंचचा कार्यक्रम
अमरावती : कलर्स व लोकमत सखीमंचद्वारे २५ जानेवारीला स्थानिक अभियंता हॉल, शेगाव नाका चौक, अमरावती येथे दुपारी ४.३० वाजता ‘सूर राइझिंग स्टार्स’चे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या स्पर्धेत १८ वर्षांच्यावरील कोणीही स्त्री-पुरूष गायक सहभागी होऊ शकतात. प्राथमिक फेरी २५ जानेवारीला दुपारी १ वाजता अभियंता हॉलमध्येच आयोजित करण्यात येणार आहे. प्राथमिक फेरीतील निवडक स्पर्धकांचा अंतिम फेरीत होणारा कलाविष्कार म्हणजेच ‘सूर राइझिंग स्टार्स’चे याकार्यक्रमाच्या माध्यमातून राइझिंग स्टार्स जगाला दिसणार आहेत. मनोरंजनाच्या दुनियेत एकापेक्षा एक सरस कार्यक्रम देऊन लहान पडद्यावर आपल्या नावाची सप्तरंगी उधळण करणारे एकमेव चॅनल म्हणजे कलर्स चॅनल. आयुष्यातील प्रत्येक भावनांचे रंग टिपून त्या भावनांचे एका वेगळ्या रंगात मालिकांद्वारे सादरीकरण करून कलर्स चॅनलने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. लोकमत सखीमंचची देखील १६ वर्षांपासून अशीच घोडदौड सुरू आहे. या अनुषंगाने पुन्हा एकदा नवोदित आणि हौशी गायक कलाकारांसाठी राइझिंग स्टार्सच्या या गायन स्पर्धेचे आयोेजन करण्यात आले आहे.
कलर्स चॅनलवर येणाऱ्या या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम लाईव्ह प्रसारित होईल. इतर शोप्रमाणे परीक्षकांसमोर येऊन कलाकारांना गाणे सादर करायचे नसून त्यांचा परफॉर्मन्सबघून जनतेला वोटिंग करायचे आहे. वोट करणाऱ्याचा चेहरा देखील स्क्रिनवर दिसेल. विख्यात गायक आणि संगीतकार शंकर महादेवन, गायिका मोनाली ठाकूर, अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांज हे सेलिब्रिटी जजेस आहेत. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी लोकमत भवन, विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती (९८५०३०३०४०८७) यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)