शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

सर्वोच्च न्यायालयाने विनाकारण वाद उकरून काढू नये, प्रकाश आंबेडकरांचे ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2022 15:39 IST

ॲड. आंबेडकर हे अमरावतीत वंचित बहुजन वंचित आघाडीच्या पदाधिकारी मेळाव्यासाठी आले असता त्यांनी पत्रपरिषदेतून केंद्र व राज्य सरकारसह सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजावरही टीका केली.

ठळक मुद्देदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा

अमरावती : सध्या देशात वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा गाजत आहे, यात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र, अशा प्रकारचे विनाकारण वाद सर्वोच्च न्यायालयाने उकरून काढू नये, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. 

ॲड. आंबेडकर हे आज (दि. २१) अमरावतीत वंचित बहुजन वंचित आघाडीच्या पदाधिकारी मेळाव्यासाठी आले असता त्यांनी पत्रपरिषदेतून केंद्र व राज्य सरकारसह सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजावरही ताशेरे ओढले.

हल्ली जाती, धर्मात तेढ निर्माण होईल, असे नेत्यांचे व्यक्तव्य आहेत. कधी मंदिर, मशीद, तर कधी हनुमान चालिसा असे अनावश्यक मुद्दे आणले जात आहेत. ज्ञानवापी मशीदचा मुद्दा देशभरात वादग्रस्त ठेवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. मग काय, सम्राट अशोकाच्या काळात बांधलेले बौद्ध विहार कुठे गेले? असा सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला. वाद उकरून काढणे हे सर्वोच्च न्यायालयाचे काम नाही. देशात शांतता पाहिजे की अशांतता हे लोकांनी ठरवलं पाहिजे असेही ते म्हणाले.

शरद पवारांनी ब्राम्हण विरोधी नाही हे सिद्ध करण्यासाठी बैठक बोलावली 

अभिनेत्री केतकी चितळे प्रकरण आता वेगळ्या वळणार गेले आहे, राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांनी आणि काही कार्यकर्त्यांनी  ब्राम्हण समाजाच्या विरोधात वक्तव्य केले आणि केतकी हे प्रकरण वेगळ्या वळणावर गेले. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना मी ब्राम्हण विरोधी नाही, हे सिध्द करण्यासाठी बैठक बोलावली, अशी  टीका ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. 

शरद पवार यांच्यावर ब्राम्हण समाजाने बहिष्कार घातल्याने या बैठकीत ब्राम्हण समाजाच्या विविध संघटनांना आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे काही जणांनी त्याच्यावरती बहिष्कार घातला याचे उत्तर शरद पवार देतील, असे ॲड. आंबेडकर म्हणाले.

दम असेल तर मला उचलून दाखवावं

देशात भाजपने दडपशाहीचे राजकारण सुरू केलं आहे, उठ सूट कोणालाही ईडीच्या नोटीस दिल्या जात आहे. भाजपने देशात मोकळं वातावरण ठेवलं नाही. मलाही ईडीची नोटीस दिली होती. त्यामुळे दम असेल मला उचलून दाखवून कारवाई करावी,असे थेट आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला दिले. मात्र यावेळी भाजपवर टीका करताना त्यांची  जीभ घरसली होती, हे विशेष.

टॅग्स :PoliticsराजकारणPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीSharad Pawarशरद पवारKetaki Chitaleकेतकी चितळेBJPभाजपा