राष्ट्रवादीच्या गटनेते पदाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु

By Admin | Updated: September 4, 2014 23:27 IST2014-09-04T23:27:54+5:302014-09-04T23:27:54+5:30

महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस फ्रं टमध्ये गटनेता पदाचा वादावर गुरुवार पासून सुनावणीला प्रारंभ झाला आहे. उद्या ५ सप्टेंबर रोजी या प्रकरणी अंतिम सुनावणी होणार असल्याची माहिती विधी सुत्रांकडून

The Supreme Court has started hearing the names of NCP's group leaders | राष्ट्रवादीच्या गटनेते पदाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु

राष्ट्रवादीच्या गटनेते पदाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु

अमरावती : महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस फ्रं टमध्ये गटनेता पदाचा वादावर गुरुवार पासून सुनावणीला प्रारंभ झाला आहे. उद्या ५ सप्टेंबर रोजी या प्रकरणी अंतिम सुनावणी होणार असल्याची माहिती विधी सुत्रांकडून मिळाली आहे.
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटचे गटनेतापदी अविनाश मार्डीकर यांची नियुक्ती कायम असल्याचा निर्णय दिला. मात्र हा निर्णय म्हणजे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस अस्तित्वात नसल्याचा उच्च न्यायालयाने दिल्याच्या पार्श्वभूमिवर या निर्णयाला आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादीचे सुनील काळे यांनी सर्वोच न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा राजकीय पक्षाचे अस्तित्व धोक्यात आणणारा असल्याचे म्हटले आहे. महापालिकेत युती किंवा आघाडी करीत असताना कोणताही प्रादेशीक किंवा राष्ट्रीय पक्ष विलीन होऊ शकत नाही, हे सुनील काळे यांनी याचिकेचा मुख्य मुद्दा बनविला आहे.
त्यानुसार गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात प्राथमिक सुनावणी सुरु झाली आहे. ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ५ सप्टेंबर रोजी अंतिम निर्णय लागण्याची शक्यता आहे. सुनील काळे यांची बाजू अ‍ॅड. मरलपल्ली यांनी मांडली तर अविनाश मार्डीकर यांच्यावतीने अ‍ॅड. शाम दिवाण यांनी युक्तीवाद केला. मार्डीकर यांची बाजू सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे उभी राहावी, यासाठी अ‍ॅड. किशोर शेळके हे सुद्धा कार्यरत आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकालावरच महापौर, उपमहापौर निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे. आघाडी की युती कोणाची सत्ता महापालिकेत स्थापन होणार हे अस्पष्ट आहे. मात्र काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंट सोबत आघाडी करण्याची तयारी केली आहे. याचा महापौर निवडणुकीवर काय परिणाम होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: The Supreme Court has started hearing the names of NCP's group leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.