बंगालहून अमरावतीत बनावट नोटांचा पुरवठा
By Admin | Updated: October 21, 2014 22:43 IST2014-10-21T22:43:38+5:302014-10-21T22:43:38+5:30
पोलिसांनी बंगालमधून शेख तजमुन शेख कलीमउद्दीन या आरोपीला बनावट नोटा प्रकरणात अटक केली आहे. शहरात बनावट नोटा पसविणारी टोळी सक्रिय झाली असून आतापर्यंत पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे.

बंगालहून अमरावतीत बनावट नोटांचा पुरवठा
अमरावती : पोलिसांनी बंगालमधून शेख तजमुन शेख कलीमउद्दीन या आरोपीला बनावट नोटा प्रकरणात अटक केली आहे. शहरात बनावट नोटा पसविणारी टोळी सक्रिय झाली असून आतापर्यंत पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे.
१७ मे २०१४ रोजी ग्रामीण गुन्हे शाखेने बनावट नोटा प्रकरणात एका आरोपीला अटक केली होती. त्या अनुशंगाने तपासात १६ आॅक्टोबर रोजी बनोसा येथील नजमोद्दीन सफरद्दोन (२६) हा आरोपी पोलिसांच्या हाती लागला. बनावट नोटा प्रकरणातील मुख्य आरोपी वसीम चायना व शेख साहिल या आरोपींना पोलिसांनी अटक करुन त्यांच्याजवळील तीन लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. या तीन लाखांपैकी ५० हजारांच्या बनावट नोटा उमेश तायडे नामक आरोपीला दिल्या होत्या. तसेच अडिच लाखांच्या नोटा पप्पु उर्फ कुलदीप विजय टापरे (२८, रा. शिवाजीनगर, दर्यापूर) या आरोपीला देण्यात आल्या होत्या. कुलदीप याने ही बनावट नोटाची रक्कम भोजनालय व रेतीच्या ठेकेदारीत गुंतविली होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन पोलिसांनी मोर्चा वळविला व १७ आॅक्टोबर रोजी पप्पू टापरे याला अटक केली. पप्पू आणि नजोमोद्दीन या दोन्ही आरोपीला न्यायालयाने २१ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात बंगाल येथून शेख तजमुन शेख कलोद्दीन या आरोपीला पोलिसांनी २२ सप्टेंबर रोजी अटक केली होती.