बडनेरा : नितीनने आपले अश्लील फोटो काढले होते. हे फोटो दाखवून तो ब्लॅकमेल करीत होता. याचा मानसिक त्रास झाल्याने त्याला संपविण्याचा निर्णय घेतला. यासाठी एका नातेवाईकाच्या मदतीने अब्दुल गनी याच्यासह तिघांना ४३ हजार रुपयांची सुपारी देऊन नितीनची हत्या केल्याची कबुली मेघाने पोलिसांना दिली. या आधारावर पोलिसांनी वरील तीन आरोपींना सोमवारी कारंजा लाड येथून अटक केली. तीनही आरोपी हे सुपारी कीलर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही कारवाई पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस आयुक्त साखरकर, गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम, बडनेर्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कडू, सहायक पोलीस निरीक्षक रवी राठोड, सुमित परतेकी, ओमप्रकाश देशमुख, संतोष शिखरे, दीपक श्रीवास, शंकर बावनकुळे, संग्राम भोजने, स्नेहल राऊत, पूजा सराटे, शीतल चव्हाण यांच्या पथकाने केली.नितीनच्या मृतदेहाची अशी लावली विल्हेवाटअब्दुल गनी याची सासरवाडी बडनेरा जुनी वस्तीतील चमन नगरातील आहे. तेथील ऑटोचालक अब्दुल अकील शेख हुसेन (३0) हा त्याच्या परिचयाचा होता. नितीनची हत्या केल्यानंतर अब्दुल गनी हा बडनेरा जुनी वस्ती येथे आला. प्रेयसीला फिरायला न्यायचे आहे, असे सांगून त्याने अब्दुल अकीलचा ऑटो भाड्याने केला. ऑटो चालकाला घेऊन गनी नंदनवन कॉलनीत मेघाच्या घराजवळ आला. समीर व गजाननने मृतदेह एका चादरीत गुंडाळला. आनंद ऑटो चालकासह पान टपरीवर जाताच उर्वरित आरोपींनी मृतदेह ऑटोत टाकला. याची माहिती अब्दुल अकीलला नव्हती. त्यानंतर मेघा व अब्दुल गनी हे ऑटोने कोंडेश्वर मार्गे रवाना झाले. ऑटोच्या मागेच आनंद आणि गजानन दुचाकीने आले. कोंडेश्वर जवळ ऑटो पोहचताच मेघा व अब्दुल गनी हे दुचाकीने अमरावतीकडे परतले. आनंद व गजानन हे दोघे ऑटोत बसले. काही वेळाने अँाटोत मृतदेह असल्याचे चालकाला समजले. परंतु आरोपींनी त्याला दमदाटी करुन गप्प केले.
४३ हजारांत दिली सुपारी
By admin | Updated: May 8, 2014 00:43 IST