मोर्शी : शनिवारी सायंकाळी ६ वाजून १५ मि. ३० सेकंदाला ४.१ रिश्टर स्केल आणि केंद्रबिंदू १२८० किमी, रात्री ११ वाजून १४ मि.५ सेकंदाला ३.५ रिश्टर स्केल आणि केंद्रबिंदू ८८० किमी अशी नोंद झालेली आहे. रविवारला पुन्हा नेपाळ येथे तीव्र भूकंपाचा धक्का जाणवला. याचीही नोंद येथे झाली. सकाळी ५ वाजून ६ मि.४० सेकंदाला ४.० रिश्टरस्केल आणि केंद्रबिंदू १२०० किमी, दुपारी १२ वाजून ४७ मि.४० सेकंदाला ४.६ रिश्टर स्केल केंद्रबिंदू ११२० किमी आणि दुपारी २ वाजता ३.८ रिश्टरस्केल केंद्रबिंदू ११२० किमीची नोंद येथे झालेली आहे. केंद्रबिंदू येथील केंद्रा पासून हजारो किमी अंतरावर असल्यामुळे येथील यंत्रावर नोंदी जरी झालेल्या असल्या, तरी प्रत्यक्षात मात्र परीसरात कोठेही भूकंपाचा धक्का जाणवला नाही.
रविवारच्या धक्क्याचीही नोंद
By admin | Updated: April 26, 2015 23:58 IST