उन्हाळ्याची लागली चाहूल; उकाड्याला सुरूवात
By Admin | Updated: February 8, 2015 23:26 IST2015-02-08T23:26:42+5:302015-02-08T23:26:42+5:30
थंडीचा हंगाम संपायला काही दिवस बाकी असतानाच बाष्पयुक्त वारे, ढगाळ वातावरण तर दिवसा ऊन यामुळे थंडीत व्यत्यय आला आहे. यामुळे राज्यातही तापमान वाढत आहे.

उन्हाळ्याची लागली चाहूल; उकाड्याला सुरूवात
अमरावती : थंडीचा हंगाम संपायला काही दिवस बाकी असतानाच बाष्पयुक्त वारे, ढगाळ वातावरण तर दिवसा ऊन यामुळे थंडीत व्यत्यय आला आहे. यामुळे राज्यातही तापमान वाढत आहे. प्रामुख्याने कमाल तापमानात सातत्याने वाढ नोंदविली गेली आहे. शनिवारी जिल्ह्याचे तापमान कमाल ३२ व किमान १७ अंश सेल्सियसवर नोंदविले गेले. तापमानातील एवढ्या वाढीमुळे उन्हाळ्याची चाहूल लागल्याचे चित्र दिसून येत आहे. आता थंडीचे प्रमाण कमी होईल, तसेच ११ व १२ फेब्रुवारी नंतर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविले आहे.
बंगालच्या उपसागरात हवेचा कमी दाबाचा नवा पट्टा निर्माण झाल्याने तेथून पुन्हा बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रात वाहू लागले आहे. त्यामुळे राज्यातील आर्द्रता वाढली असून ढगाळ वातावरनही निर्माण होत आहे. याचा व्यत्यय थंडीत येत असून ती गायब होण्याच्या मार्गावर आहे. सूर्याचे उत्तरायण सुरु झाल्यावर थंडी कमी होऊन तापमानात वाढत होणार आहे.
महाराष्ट्र व कोकणमधून थंडी गायब होत असून तेथील तापमानात मोठी वाढ नोंदविली गेली आहे. त्यामुळे दिवसा उकाडा जाणवत असल्याचे चित्र आहे. रात्री उशिरा गारवा जाणवतो, दुपारी कडक ऊन व रात्री थंडी, असे वातावरण आहे.