सारांश छोट्या बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:10 IST2020-12-26T04:10:46+5:302020-12-26T04:10:46+5:30

धामणगाव रेल्वे : येथील कालीमाता मंदिरालगत राहणाऱ्या श्रीकृष्ण निखाडे (३५) याला कामावर उशिरा का आला, असा जाब विचारून तिघांनी ...

Summary short news | सारांश छोट्या बातम्या

सारांश छोट्या बातम्या

धामणगाव रेल्वे : येथील कालीमाता मंदिरालगत राहणाऱ्या श्रीकृष्ण निखाडे (३५) याला कामावर उशिरा का आला, असा जाब विचारून तिघांनी मारहाण केली. २३ डिसेंबर रोजी ही घटना घडली. याप्रकरणी दत्तापूर पोलिसांनी आरोपी नीलेश गायकवाड, अक्षय गायकवाड, अशोक गायकवाड (तिघेही रा. धामणगाव) यांचेविरूद्ध गुन्हा दाखल केला.

------------------

बासलापुरात तरुणावर चाकूहल्ला

चांदूर रेल्वे : तालुक्यातील बासलापूर येथील मधु माणिक मंजुळकर (२३) याचेवर चाकूने वार करण्यात आला. पुढील चौकापर्यंत बॅन्ड वाजवा, असे म्हटल्याने २२ डिसेंबर रोजी ही घटना घडली. चांदूर रेल्वे पोलिसांनी बँड पार्टीशी संबंधित एकाविरूद्ध गुन्हा नोंदविला.

----------------

मंगरूळ दस्तगीरमधून एक लाख रोख पळविली

मंगरूळ दस्तगीर : येथील लक्ष्मी जगनराव खडसे (५०) यांच्या घरातील लोखंडी कपाटातून १ लाख २ हजार रुपये रोख रक्कम लंपास करण्यात आली. २२ ते २३ डिसेंबरदरम्यान ही घटना घडली. मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.

---------------

तिवसा येथे तरुणाला मारहाण

तिवसा : येथील संतोष वसंतराव बिजवे (३५, तेलीपुरा) याला मारहाण करण्यात आली. २३ डिसेंबर रोजी ही घटना घडली. याप्रकरणी तिवसा पोलिसांनी आरोपी आकाश ऊर्फ चेला रमेश शेंडे (रा. तिवसा) विरूद्ध गुन्हा नोंदविला.

-----------------

भूगावजवळ अपघात, इसमाचा मृत्यू

परतवाडा : अमरावती मार्गावरील भूगाव पुलाच्या समोर दुचाकी स्लिप होऊन झालेल्या अपघातात मनोहर शंकरराव पाटे (रा. अंजनगाव सुर्जी) यांचा मृत्यू झाला. २२ डिसेंबर रोजी रात्री ९.३० च्या सुमारास हा अपघात घडला. पाटे हे श्रीराम नांदूरकर (३४, अंजनगाव सुर्जी) याच्या दुचाकीवर मागे बसून अमरावतीहून परतत असतना हा अपघात झाला. अचलपूर पोलिसांनी २३ डिसेंबर रोजी नांदुरकरविरूद्ध गुन्हा दाखल केला.

----------------

कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर

अचलपूर : येथील गोपी ढाबा ते हरम रस्त्यादरम्यान कारने दिलेल्या धडकेत रामभाऊ माहुरे (रा. भिलोना) हे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. २२ डिसेंबर रोजी दुपारी हा अपघात घडला. याप्रकरणी सरमसपुरा पोलिसांनी एमएच २७ बीई ५५८१ या कारच्या चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला. माहुरे यांच्यावर परतवाडा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

----------------

नर्सरी गावातून दुचाकी लंपास

परतवाडा : नजिकच्या गौरखेडा कुंभीलगतच्या नर्सरी येथील गणेश खंडेझोड (४२) यांच्या मालकीची एमएच २७ बीएम १०६६ या क्रमांकाची दुचाकी लंपास करण्यात आली. ६ व ७ डिसेंबरदरम्यान ही घटना घडली. परतवाडा पोलिसांनी २३ डिसेंबर रोजी दुपारी ३ च्या सुमारास अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला.

---------------

प्रवासादरम्यान सोन्याचे दागिने लंपास

परतवाडा : मोर्शी तालुक्यातील शिरखेड येथील लता अडने (३६) यांच्या पर्समधून ९४ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिणे व १५०० रुपये रोख चोरीला गेले. परतवाडा ते वडगाव फत्तेपूर गावादरम्यान २२ ते २३ डिसेंबर रोजी ही घटना घडली. परतवाडा पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.

--------------------

चांदुरबाजारातील दोन दुकाने फोडली

चांदूरबाजार : येथील मो. सलिम मो. शकूर (५५. बेलोरारोड) यांचे किराणा दुकानातून ३० हजार रुपये रोख लंपास करण्यात आली. २२ ते २३ डिसेंबरच्या रात्रीदरम्यान ही घटना घडली. तर परिसरातील दिनेश धर्माळे यांच्या किराणा दुकानातून १५०० रुपये रोख लांबविण्यात आली. चांदूरबाजार पोलिसांनी २३ डिसेंबर रोजी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.

-----------------------------

शिरजगाव बंड येथून दुचाकी लंपास

ब्राम्हणवाडा थडी : शिरजगाव बंड येथील एका बँक परिसरातून एमएच २७ बीएस ११६१ ही दुचाकी लांबविण्यात आली. २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ही घटना घडली. श्रीकांत पंजाबराव इंगळे (२७, तुळजापूर गढी) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.

--------------

महात्मा फुले कॉलनीत चोरी

चांदूर बाजार : येथील महात्मा फुले कॉलनीतील रहिवासी अमर बाबुलाल काळे यांच्या घरातून ७४ हजार ४५० रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने लंपास करण्यात आले. अज्ञात आरोपीने २३ डिसेंबर रोजी रात्री ११ च्या पुढे काळे यांच्या घराचे कुलूप तोडले. याप्रकरणी चांदूरबाजार पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.

---------------------

प्रवासादरम्यान सोन्याचे दागिने लंपास

चांदूर बाजार : तालुक्यातील सोनोरी येथील विद्या चर्जन (४५) या महिलेकडील ३७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. येथील जयस्तंभ ते बसडेपोदरम्यान २३ डिसेंबर रोजी दुपारी २ च्या सुमारास ही घटना घडली. चांदूर बाजार पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.

---------------------

दिदंबा येथे महिलेस मारहाण

धारणी : तालुक्यातील दिदंबा येथील एका ४६ वर्षीय महिलेस कुºहाडीच्या दांड्याने मारहाण करण्यात आली. तथा शिवीगाळ करून मारण्याची धमकी देण्यात आली. २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी धारणी पोलिसांनी रामप्रसाद जांबेकरविरूद्ध गुन्हा नोंदविला.

-------------------

खानापुरातील सराफा दुकानात चोरी

मोर्शी/नेरपिंगळाई : तालुक्यातील खानापूर येथील मोहन पाटने यांच्या मालकीचे निर्भय ज्वेलर्स फोडून चोराने ६घ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. २३ डिसेंबर रोजी दुपावी ही घटना घडली. मोर्शी पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंदविला.

---------------------

फोटो पी २५ वरूड

भटकंती करणाºयांना प्रेमाची ऊब

वरूड : येथील डॉ. महेंद्र राऊत यांनी शहरातील निराधार, भटके, मतिमंद व भीक मागून जगणाºयांना मायेची उब दिली. काहींना सोबत घेऊन त्यांनी त्यांच्या जेवणाची व पांघरुणाची व्यवस्था केली. त्यांना दररोज जेवणाचा डबा पुरविण्याचा संकल्प केला. ठाणेदार श्रेणीक लोढा यांचे हस्ते कपडे व पांघरून देण्यात आल

Web Title: Summary short news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.