Summary news | सारांश बातम्या

सारांश बातम्या

साहेबराव पवित्रकार

दर्यापूर : माजी पोलीस पाटील साहेबराव श्रीरंगजी पवित्रकार (८३, रा. लासूर) यांचे निधन झाले. ते प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुधीर पवित्रकार यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली व मोठा आप्तपरिवार आहे.

-------------

फोटो पी ११ देशमुख

वैकुंठराव देशमुख

गणोरी : येथील श्री संत परमहंस महंमद खान महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वैकुंठराव व्यंकटराव देशमुख यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यापश्चात दोन मुले, चार मुली व बराच आप्तपरिवार आहे.

--------------

फोटो पी ११ ढवळे

भीमाबाई ढवळे

अंजनगाव सुर्जी : काळगव्हाण येथील सरपंच ज्ञानदेव ढवळे यांच्या मातोश्री भीमाबाई नारायणराव ढवळे (९०) यांचे रविवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली व बराच आप्तपरिवार आहे.

---------------

विद्यापीठात महात्मा जोतिबा फुले जयंती

अमरावती : सत्यशोधक चळवळीचे जनक क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची जयंती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, कुलसचिव तुषार देशमुख, वित्त व लेखा अधिकारी भारत कऱ्हाड तसेच विद्यापीठाचे कर्मचारी उपस्थित होते.

-------------------

फोटो पी ११ मनपा

मनपात महात्मा जोतिबा फुले जयंती

अमरावती : महापौर चेतन गावंडे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात हारार्पण करण्यात आले. यावेळी प्रशासनातील अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारीदेखील उपस्थित होते. स्थानिक चित्रा चौकातील महात्म्याच्या पुतळ्याला हारार्पण करण्यात आले.

---------------

श्री शिवाजी शिक्षण संस्थेत भाऊसाहेबांना नमन

अमरावती : शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी सकाळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांनी डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती केंद्र येथील भाऊसाहेबांच्या पुतळ्याला हारार्पण करून आदरांजली वाहिली. याप्रसंगी डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. पद्माकर सोमवंशी, अधिष्ठाता डॉ. ए.टी. देशमुख, आशिष इखे व राजेश गाडगे उपस्थित होते.

----------

ब्राह्मणवाडा थडी येथे महात्मा फुले जयंती

ब्राह्मणवाडा थडी : स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच वंदना गवई, राजेंद्र उल्हे, मुरलीधर ठाकर, नंदकिशोर वासनकर, बाबू इनामदार, प्रदीप पंडागरे, प्रमोद गवई, सचिव सुरेंद्र देशमुख उपस्थित होते. संचालन व आभार प्रदर्शन प्रशांत दारोकर यांनी केले.

---------------

ओंकारेश्वर दर्शन व नर्मदा स्नानाला प्रतिबंध

अमरावती : चैत्र अमावस्या व पाडव्यानिमित्त अनेक भाविक दर्शनासाठी ओंकारेश्वरला जातात. तथापि, यंदा महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील अनेक जिल्ह्यांत कोरोनाची साथ असल्याने बाहेरून येणाऱ्या नागरिकांना मनाई असल्याचे पूर्व निमाड- खंडवा जिल्हाधिकारी अनय द्विवेदी यांनी जिल्हा प्रशासनाला कळवले आहे. द्विवेदी यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना लिहिलेल्या पत्रात नमूद आहे की, १२ एप्रिलची चैत्र अमावस्या व १३ तारखेच्या गुढीपाडव्यानिमित्त अनेक भाविक ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन व नर्मदा स्नानासाठी तसेच खांडवा जिल्ह्यातील पुनासा तालुक्यातील संत सिंगाजी समाधीस्थळाच्या दर्शनासाठी येत असतात. तथापि, आता दोन्ही राज्यांत कोरोनाची साथ आहे. गर्दी टाळण्यासाठी ओंकारेश्वर मंदिर, तेथील नर्मदेचा तट तसेच संत सिंगाजी समाधीस्थळ येथे प्रवेशाबाबत निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

Web Title: Summary news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.