सारांश बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:10 IST2021-07-10T04:10:22+5:302021-07-10T04:10:22+5:30
------------------- पर्यावरण संरक्षणासाठी उपायुक्तांना निवेदन अमरावती: विनायक विद्यामंदिर कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोतांचे रक्षण व ...

सारांश बातम्या
-------------------
पर्यावरण संरक्षणासाठी उपायुक्तांना निवेदन
अमरावती: विनायक विद्यामंदिर कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोतांचे रक्षण व संवर्धन करून पर्यावरण, जैवविविधता व मानवी भविष्याच्या दृष्टीने घातक होत चाललेल्या या घटकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्याअनुषंगाने ग्रीन सोल्जर व जिओ क्लबकडून महापालिका उपायुक्त रवि पवार यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी प्राचार्य पद्माकर टाले, सागर पडोळे, शिवाजी मानकर, दीपावली राऊतल संगीता बंड, शीतल काळे उपस्थित होते.
-----------------
इंडियन बुद्धा स्टँच्यू सुप्रभात ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण
अमरावती: इंडियन बुद्धा स्टँच्यू सुप्रभात ग्रुपच्या वतीने बाजार समितीचे संचालक विकास इंगोले, सोमेश्वर नोकरी संदर्भचे संपादक शिवाजी डोंगरे, बोधिवृक्ष प्रेमी प्रवीण वासनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यशस्वितेसाठी सुधाकर घरडे, सलीमभाई रायलीवाले, जयपाल मेश्राम, सचिन सुखदेवे यांनी परिश्रम घेतले.