सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:09 AM2021-07-04T04:09:38+5:302021-07-04T04:09:38+5:30

----------------- उदारीचे पैसे मागितल्याने मारहाण धारणी : मजुरीचे पैसे मागण्यास गेलेल्या शेतमजुराला बाशाने मारहाण करण्यात आली. ही घटना तालुक्यातील ...

Summary news | सारांश बातम्या

सारांश बातम्या

Next

-----------------

उदारीचे पैसे मागितल्याने मारहाण

धारणी : मजुरीचे पैसे मागण्यास गेलेल्या शेतमजुराला बाशाने मारहाण करण्यात आली. ही घटना तालुक्यातील भिरोटी धारणी येथे १ जुलै रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास घडली. शंकर लालू मावस्कर(५०) यांच्या तक्रारीवरून धारणी पोलिसांनी पाटू मोट्या जांबेकर (रा. भिरोटी धारणी) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

--------------------------

गवंडी कामाच्या मजुरीच्या पैशावरून मारहाण

धारणी : सेंट्रींगच्या कामावरील मजुराने पैशाची मागणी केली असता, नकार देऊन हातोडीने मारून जखमी केले. ही घटना धारणी शहरात १ जुलै रोजी दुपारी २ वाजतादरम्यान घडली. गणेश मेगुलाल उईके यांच्या तक्रारीवरून धारणी पोलिसांनी महेश सुरेश उइके, हेमंत सुरेश उइके, सुरेश मेगुलाल उइके (रा. धारणी) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

---------------

भरधाव ट्रकने महिलेला चिरडले

चिखलदरा : भरधाव ट्रकने महिलेला चिरडल्याने महिलेचा जागीत मृत्यू झाला. ही घटना कुकरु ते घटांग मार्गावर २ जुलै रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. कमला बाला अखंडे (६५) असे मृताचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, चिखलदरा तालुक्यातील कुकरू ते घटांग मार्गावर सकाळी १० वाजता दरम्यान एमएच ०१ एपी ७१६९ क्रमाकांच्या ट्रकचालकाचे स्टेअरिगंवरील नियंत्रण सुटल्याने थेट महिलेच्या अंगावर ट्रक नेले. ट्रकच्या मागील चाकाखाली महिला गंभीररीत्या चिरडल्याने जागीच गतप्राण झाली. गणाजी बालाजी अखंडे (५०, भैसदेही) यांच्या तक्रारीवरून चिखलदरा पोलिसांनी सदर ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला.

---------------

मुलीला फूस लावून पळविले

ब्राह्मणवाडा (थडी) : मुलगी बराच वेळेपर्यंत घरी न आल्याने नातेवाईकांकडे शोधाशोध केली. परंतु मिळून आली नाही. नातेवाईकांच्या माहितीनुसार तिला अजय शालिकराम दहीकर यांनी फुस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आईने ब्राह्मणवाडा थडी पोलिसात दिली. यावरून पोलिसांनी अजय शालिकराम दहीकर (रा. कविठा) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

------------------------

बसस्थानकाजवळून दुचाकी लंपास

दर्यापूर : बसस्थानकाजवळील एका हॉटेलसमोर उभी केलेली दुचाकी एमएच २७ एई ६०३० ही अज्ञात चोरट्याने लंपास केली. ही घटना १ जुलै रोजी दुपारी दीड ते दोन वाजतादरम्यान घडली. विजय वासुदेव राऊत (४६, लासूर) यांच्या तक्रारीवरून दर्यापूर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.

---------------------

शेतात गेलेल्या महिलेचा विनयभंग

नांदगाव खंडेश्वर : शेतात गवत कापत असताना मागून येऊन महिलेचा विनयभंग करून ‘तू कभी ना कभी मेरे हात लगेगी‘ छोडुंगा नही, अशी धमकी दिल्याची घटना राजुरा शिवारात २ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजतादरम्यान घडली. महिलेच्या तक्रारीवरून नांदगाव पोलिसांनी गजानन खाडे (रा. राजुरा) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

------------------------

खेळत असलेली मुलगी पळविली

आसेगाव पूर्णा : पाहूणपणावर आलेली मुलगी अन्य मुलींसोबत खेळत असताना अज्ञाताने तिला पळविल्याची घटना आसेगाव पूर्णा येथे २ जुलै रोजी उघडकीस आली. तक्रारीवरून आसेगाव पोलिसांनी संशयित आरोपी शुभम माहेर गुडधे (रा. येवता) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

-------------------

बांधकामावरील साहित्याची चोरी

माहुली जहागीर : रतन इंडिया कंपनीच्या बांधकाम स्थळाहून २० किलो लोखंडी साहित्य चोरून नेणाऱ्याला सुरक्षा गार्डच्या मदतीने पकडले. तक्रारीवरून माहुली जहागीर पोलिसांनी आरोपी अन्नाजी खांडेकर (३४), संजय मेश्राम (३०, दोघे रा. शेंदूरजना बाजार) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

------------------------

विना रॉयल्टी रेतीची चोरी

धामणगाव रेल्वे : परसोडा चौकात विना रॉयल्टी रेतीने भरलेला ट्रक एमएच ३२ बी ९७६३ चोरट्या मार्गाने वाहतूक करताना दत्तापूर पोलिसांनी पकडले. ही घटना २ जुलै रोजी पहाटे ३.५० वाजता उघडकीस आली. पोलिसांनी अशोक कन्नाके (रा. सावळा), शुभम बिडकर (रा. धामणगाव रेल्वे) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

----------------------------

क्षुल्लक कारणावरून युवकाला मारहाण

धामणगाव रेल्वे : चमकी व रंग मागण्यास घरी आलेल्या युवकाच्या कपाळावर लोखंडी वस्तूने मारून जखमी केल्याची घटना जुना धामणगाव येथे २ जुलै रोजी घडली. संदीप रमेश राऊत याच्या तक्रारीवरून दत्तापूर पोलिसांनी रामदास महादेव व्यवहारे, अनिल व्यवहारे (दोघे रा. जुना धामणगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

---------------

क्षुल्लक कारणावरून वडिलांना धमकी

शेंदूरजना घाट : शेतात जाऊन पाहणी करीत जा, या च मुद्द्यावर मुलाने शिवीगाळ करून धमकी दिल्याची घटना मलकापूर येथे २ जुलै रोजी घडली. धनराज विठ्ठल पाटील (५२) यांच्या तक्रारीवरून शेंदूरजना घाट पोलिसांनी नीलेश धनराज पाटील (२५, रा. मलकापूर) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

Web Title: Summary news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.