सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:12 AM2021-05-14T04:12:20+5:302021-05-14T04:12:20+5:30

चांदूरबाजार : तालुक्यातील थूगाव पिंपरी येथे गणेश धुर्वे व त्यांच्या पत्नीला मारहाण करण्यात आली. ९ मे रोजी रात्री ...

Summary news | सारांश बातम्या

सारांश बातम्या

googlenewsNext

चांदूरबाजार : तालुक्यातील थूगाव पिंपरी येथे गणेश धुर्वे व त्यांच्या पत्नीला मारहाण करण्यात आली. ९ मे रोजी रात्री ही घटना घडली. अकारण हा वाद झाला. चांदूरबाजार पोलिसांनी याप्रकरणी आरोपी सूरज धुर्वे, संजय धुर्वे (दोन्ही रा. थूगाव) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

--------

चांदूरबाजारात वृद्धाला मारहाण, शिवीगाळ

चांदूरबाजार : येथील राऊतपुरा भागातील बाबाराव हिवसे यांना काठीने मारहाण करण्यात आली. त्यांच्यासह त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करण्यात आली. बकरीचा चारा आणण्याच्या कारणावरून १० मे रोजी हा वाद झाला. चांदूरबाजार पोलिसांनी याप्रकरणी रवि बाबाराव हिवसे व एका महिलेविरूद्ध गुन्हा दाखल केला.

------------

शिरजगाव बंड येथे तरुणाला मारहाण

चांदूरबाजार : तालुक्यातील शिरजगाव बंड येथे हरिदास मनोहरे (३५) याला मारहाण करण्यात आली. दारू पिण्यास, सोबत येण्यास नकार दिल्याने १० मे रोजी सकाळी ही घटना घडली. चांदूरबाजार पोलिसांनी याप्रकरणी आरोपी धनंजय कडू (रा. शिरजगाव बंड) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

---------------

वाल्मिकपूर येथे मुलीला पळविले

पथ्रोट : अचलपूर तालुक्यातील वाल्मिकपूर भागातून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेण्यात आले. ५ मे रोजी सायंकाळी ही घटना घडली. पथ्रोट पोलिसांनी याप्रकरणी आरोपी नितेश वानखडे (२५, काकडा) विरूद्ध १० मे गुन्हा दाखल करण्यात आला.

------------

रक्कम दुप्पट करण्याची बतावणी, फसवणूक

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील गावंडगाव येथील एका व्यक्त ीची १० हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. गुंतवणूक व पैसे दुप्पटीची बतावणी त्यासाठी करण्यात आली. दुप्पट झालेली रक्कम आपल्या खात्यात येईल, असे इमेलद्वारे सांगण्यात आले. मात्र, रक्कम जमा झाली नाही. याप्रकरणी रहिमापूर पोलिसांनी १० मे रोजी अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंदविला.

-------------

लोणी येथून अवैध रेती वाहतूक

बेनोडा : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणी येथून अवैध रेती वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली व १ ब्रास रेती जप्त करण्यात आली. ९ मे रोजी बेनोडा पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी आरोपी गौरव धनराज झाडे (२५, रा. लोणी) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

------------

खेड येथे तरुणाला मारहाण

मोर्शी : तालुक्यातील खेड येथील अंकुश गजानन लोणारे २३) याला काठीने मारहाण करण्यात आली. घरासमोर रेती व विटा टाकण्यास मज्जाव केल्याने ९ मे रोजी ही घटना घडली. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी आरोपी शेषराव तायवाडे व दिनेश तायवाडे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.

-------------

रेतीचोराने ट्रॅक्टर पळविला

मोर्शी : रेतीचोराने ट्रॅक्टर ट्रॉली पळवून नेल्याची घटना येरला येथे ९ मे रोजी रात्री ११.३० च्या सुमारास घडली. वनकर्मचाऱ्याने त्या ट्रॅक्टरट्रॉलीचा पंचनामादेखील केला होता. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी वनकर्मचारी नितीन लंगडे (यावली शहीद) यांच्या तक्रारीवरून आरोपी दिनेश कवडे, विजय परतेती (दोन्ही रा. पाळा) व मंगेश गुल्हाने (रा. मोर्शी) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

------------

वरखेड येथे तरुणाला मारहाण

तिवसा : तालुक्यातील वरखेड येथील अमित विघ्ने (२६) याला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. ९ मे रोजी ही घटना घडली. याप्रकरणी तिवसा पोलिसांनी आरोपी पंकज रंगारी (रा. वरखेड) याचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अकारण हा वाद झाला.

----------

सुरवाडी येथून दुचाकी लंपास

तिवसा : तालुक्यातील सुरवाडी येथून एमएच २७ एटी ६८९७ या क्रमांकाची दुचाकी लंपास करण्यात आली. २० ते २१ एप्रिलदरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी तिवसा पोलिसांनी सुरवाडी येथील एका मुलीच्या तक्रारीवरून १० मे रोजी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.

--------------

कु-हा वनखंडातून सोलर बॅटरी लंपास

कु-हा : कु-हा वनखंडातील शासकीय रोपवनातील १९ हजार ५०० रुपये किमतीची सोलर बॅटरी व अन्य साहित्य चोरीला गेले. ८ मे रोजी सकाळी ही घटना उघड झाली. याप्रकरणी कु-हा पोलिसांनी भावना पातालवंशी यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.

--------------

दिघी महल्ले रेतीघाटावर अडवणूक

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील दिघी महल्ले रेतीघाटावर आकाश चव्हाण (२९, दिघी) याची अडवणूक करण्यात आली. त्यांच्या दुचाकीची चावी काढण्यात आली. १० मे रोजी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी आकाश चव्हाण यांच्या तक्रारीवरून मंगरुळ दस्तगीर पोलिसांनी आरोपी चेतन परडखे, प्रशांत बायस्कार (रा. पेठ रघुनाथपूर), ऋषी ठाकरे व अन्य चार ते पाच इसमांविरूद्ध गुन्हा दाखल केला.

----------------

हुमनी अळी नियंत्रणाकरिता उपाययोजना करा

शिंदी बु : नुकतीच पूर्वमोसमी पावसाला सुरुवात झाली आहे. आता हुमनीचे प्रौढ भुंगेरे प्रजननकरिता बाहेर पडण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात होईल. तेव्हा सर्व शेतकऱ्यानी आपल्या शेतात कडूनिंब किंवा बाभळीच्या झाडाखाली अल्प खर्चाचा प्रकाश सापळा तसेच एरंड आंबवण सापळा लावण्याचे कृषिसहायक सतीश फत्तेपूर यांनी केले आहे.

---------

फोटो पी १३ नुटा -

नुटातर्फे व्हॅक्यूम क्लिनर, नेब्युलाईजर मशीन भेट

अमरावती : नुटा प्राध्यापक संघटनेतर्फे कोविड सुपर स्पेशालिटी सेंटरला व्हॅक्यूम क्लिनर व १० नेब्युलाईजर मशीन भेट देण्यात आल्या. नुटाचे अध्यक्ष प्रवीण रघुवंशी यांनी संघटना सतत या कार्यात सहभागी राहील व मदत करेन, असे सांगितले. नुटाचे महेंद्र मेटे, नितीन चांगोले, दिलीप हांडे, विलास ठाकरे, सुभाष गावंडे या प्रसंगी उपस्थित होते.

----------------

भारतीय मजदूर संघातर्फे परिचारिकांचा सत्कार

अमरावती : आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाचे औचित्य साधून डॉ. हेडगेवार हॉस्पिटलमधील परिचारिका आणि वॉर्ड बॉयचा सत्कार करण्यासाठी महाराष्ट्र मोटर कामगार फेडरेशनने पुढाकार घेतला. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र मोटर कामगार फेडरेशन अजय देशपांडे, राजेंद्र दोड, सतीश कुसरे, शैलेश विश्वकर्मा आणि डॉ. हेडगेवार हॉस्पिटलचे मुख्य व्यवस्थापन अधिकारी मंगेश कुलकर्णी उपस्थित होते.

Web Title: Summary news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.