सारांक्ष/ हॅलो पानासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:34 IST2020-12-04T04:34:08+5:302020-12-04T04:34:08+5:30
अमरावती : बडनेरा गांधी विद्यालयासमाेर रस्ता निर्मितीचे कार्य संथगतीने सुरू आहे. त्यामुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास होत असून, रस्ते ...

सारांक्ष/ हॅलो पानासाठी
अमरावती : बडनेरा गांधी विद्यालयासमाेर रस्ता निर्मितीचे कार्य संथगतीने सुरू आहे. त्यामुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास होत असून, रस्ते निर्मितीची कामे वेगाने करावीत, अशी मागणी आहे. काही वेळा वाहतूक कोंडीचीही समस्या उद्भवत असल्याच्यग्वाहनधारकांच्या प्रतिक्रिया आहेत.
---------------------
चांदनी चौकात पूल निर्मितीने वाहतुकीची समस्या
अमरावती : स्थानिक चांदनी चौकात पूल निर्मितीच्या कामामुळे दिवसातून अनेकदा या मार्गावर वाहतकुीची समस्या निर्माण होत आहे. पूल निर्मितीचे काम वेगाने करावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
-------------------
ॲकेडमिक स्कुलच्या प्रांगणात कचरा
अमरावती : वलगाव मार्गावरील ॲकेडमिक स्कुलच्या प्रांगणार मोठ्या प्रमाणात कचरा साठवून ठेवला जात आहे. तसेच या भागातील व्यवसायिक, रहिवासी शाळेच्या प्रांगणात कचरा आणून टाकतात. त्यामुळे शाळेच्या मैदाना डम्पिंग ग्राऊंडचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
----------------------
बसस्थानक भागात हातगाड्यांची समस्या
अमरावती : येथील मध्यवर्ती बसस्थानक मार्गावर हातगाड्या व्यवसायांमुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. बरेचदा रस्त्यावर हातगाड्या लागत असल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे.
---------------------
विद्यापीठ मार्गावर उघड्यावर मांस विक्री
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्तापीठ मार्गावर उड्डाण पूुलाच्या समोरील भागात उघड्यावर मांस विक्री होत आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही बाब योग्य नाही, मांस घेण्यासाठी रस्त्यावरच वाहने उभी करण्यात येत आहेत.