सुमितने दिला कृत्रिम हातांना जिवंतपणा!

By Admin | Updated: August 18, 2015 00:15 IST2015-08-18T00:15:00+5:302015-08-18T00:15:00+5:30

शरीरातील संवेदनांमधून हालचाल करणारे ‘रोबोटिक हॅन्ड’ अमरावतीच्या सुमित रौराळे नामक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने संशोधनातून तयार केले आहेत.

Sumitene gave artificial hands life to life! | सुमितने दिला कृत्रिम हातांना जिवंतपणा!

सुमितने दिला कृत्रिम हातांना जिवंतपणा!

 आगळे संशोधन : आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल
वैभव बाबरेकर  अमरावती
शरीरातील संवेदनांमधून हालचाल करणारे ‘रोबोटिक हॅन्ड’ अमरावतीच्या सुमित रौराळे नामक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने संशोधनातून तयार केले आहेत. या संशोधनाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली असून यासाठी सुमितला युकेतील किंग्ज विद्यापीठाने पुढील संशोधनासाठी आंमत्रित केले आहे.
स्थानिक फॉरेस्ट कॉलनीतील रहिवासी सुमित अरुण रौराळे हा नागपूर येथील प्रादेशिक आरोग्य प्रयोगशाळेचे मुख्य रसायनशास्त्रज्ञ व अमरावतीच्या जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेचे प्रभारी कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी अरुण रौराळे यांचा मुलगा आहे. सुमितने २०१२ ते १४ दरम्यान शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स इंजीनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यामध्ये त्याने ‘बायो मेडिकल सिग्नल प्रोसेसिंग’ या प्रकल्पावर संशोधन करून हा ‘रोबोटिक हॅन्ड’ तयार केला. हा कुत्रिम हात शरिरातील स्नायूच्या संवेदनांतून हालचाली करणार आहे. यापुढे पक्षाघाताच्या रूग्णांसाठी सुमित असे संशोधन करणार आहे.

Web Title: Sumitene gave artificial hands life to life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.