मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रारीसाठी सरसावली सुकाणू समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 00:42 IST2017-10-21T00:42:10+5:302017-10-21T00:42:21+5:30
शेतकºयांच्या मागण्यांबाबत मान्य न करता त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत २० आॅक्टोबर रोजी नांदगाव खंडेश्वर, तिवसा, ...

मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रारीसाठी सरसावली सुकाणू समिती
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : शेतकºयांच्या मागण्यांबाबत मान्य न करता त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत २० आॅक्टोबर रोजी नांदगाव खंडेश्वर, तिवसा, कुºहा व इतर पोलीस ठाण्यांमध्ये सुकाणू समितीने निवेदन दिले.
शेतकºयांचा सातबारा कोरा करू, स्वामिनाथन आयोग लागू करू हे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते; मात्र अद्यापही हे आश्वासन त्यांनी पूर्ण केले नसल्याने शेतकरी आत्महत्या होत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात १८ शेतकरी फवारणीदरम्यान मृत्युमुखी पडले. या घटनांना मुख्यमंत्री जबाबदार असून, त्यांच्याविरोधात फसवणूक, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून घ्यावा, यासाठी तिवसा पोलीस ठाण्यात सुकाणू समितीने तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्यासोबत चंद्रकांत वडस्कर, प्रकाश सोनोने, महादेव गारपवार, शफीक शाह आदी आंदोलकांनी चर्चा केली.
नांदगाव खंडेश्वर येथे ठाणेदारांना निवेदन
नांदगाव खंडेश्वर : स्थानिक पोलिस ठाण्यातही मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल करण्याबाबत ठाणेदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी अ.भा. किसान सभेचे जिल्हा सचिव श्याम शिंदे, तुकाराम भस्मे, पंडितराव ढोके, नारायण भगवे, ज्ञानेश्वर शिंदे, प्रभाकर शिंदे, योगेश अवझाडे, दिलीप महल्ले, अमोल धवसे, इद्रिसभाई, हरिदास देशमुख, रामदास मते, अनिल मारोटकर, सतीश शिंदे, प्रफुल्ल देशमुख, विनोद वैद्य आदी उपस्थित होते.
कुºह्यात किसान सभेची तक्रार
कुºहा : पोलिस ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भादंविचे कलम ३०४, ३०६, ४२० अन्वये गुन्हे दाखल करण्यासाठी बलिप्रतिपदेच्या दिवशी किसान सभेचे शिष्टमंडळ पोहोचले. याप्रकरणी कोठे तरी एका ठिकाणी गुन्हे दाखल होणार, तुमची तक्रार वरिष्ठांना पाठवू, असे ठाणेदारांनी सांगितले. याप्रसंगी किसान सभेचे राज्य सचिव अशोक सोनारकर, दिलीप नाहाट, विजयसिंह नाहाटे, यादवराव पाखरे, सै. जहांगीर, संतोष भैसे, राजाभाऊ बाभूळकार, कुंजनसिंह बंगरे, ज्ञानेश्वर मानमोडे, सचिन सखी, उमेश मेसरे, प्रशांत लिलर्वे, जाफरमियाँ उपस्थित होते.