घर खाली करण्याच्या वादातून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:13 AM2021-09-25T04:13:16+5:302021-09-25T04:13:16+5:30

धनराज लेनमधून मंगळसूत्र लंपास अमरावती : अंबागेटमधील धनराज लेनमध्ये राहणा-या एका महिलेच्या गळ्यातून ५३ ग्रॅमच्या मंगळसूत्रापैकी अर्धवट मंगळसूत्र लंपास ...

Suicide over house demolition dispute | घर खाली करण्याच्या वादातून आत्महत्या

घर खाली करण्याच्या वादातून आत्महत्या

Next

धनराज लेनमधून मंगळसूत्र लंपास

अमरावती : अंबागेटमधील धनराज लेनमध्ये राहणा-या एका महिलेच्या गळ्यातून ५३ ग्रॅमच्या मंगळसूत्रापैकी अर्धवट मंगळसूत्र लंपास करण्यात आले. महिलेला जाग आली, तेव्हा आरोपी पळून गेला. २४ सप्टेंबर रोजी रात्री २.४५ च्या सुमारास ही घटना घडली. खोलापुरी गेट पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

//////////////

बडनेरा येथे कर्मचा-यांची आत्महत्या

बडनेरा : येथील अशोकनगर भागात राहणा-या शरद दादाराव तिरपुडे (३३) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो नागपूर येथे सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत होता. २४ सप्टेंबर रोजी सकाळी ही घटना उघड झाली. तो दारू पिण्याच्या सवयीचा होता, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

//////////////

नवी वस्तीत तरुणाची आत्महत्या

बडनेरा : नवी वस्ती बडनेरा भागातील हमालपुरा येथील शिवा महादेव अंबाडरे (३२) याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. २३ सप्टेंबर रोजी ही घटना घडली. बडनेरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

//

Web Title: Suicide over house demolition dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app