अमरावतीत पोलीस कर्मचाऱ्याकडून आत्महत्येचा प्रयत्न; रुग्णालयात उपचार सुरू
By प्रदीप भाकरे | Updated: June 17, 2023 23:57 IST2023-06-17T23:56:34+5:302023-06-17T23:57:14+5:30
घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठ ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले.

अमरावतीत पोलीस कर्मचाऱ्याकडून आत्महत्येचा प्रयत्न; रुग्णालयात उपचार सुरू
अमरावती - पोलिस मुख्यालयात कार्यरत एका पोलीस अंमलदाराने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शनिवारी रात्री 10.30 च्या सुमारास नांदगाव पेठ टोल नाक्यावरील चौकीमागे हा प्रकार उघड झाला.
सतीश महल्ले असे त्या पोलीस अंमलदाराचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. रात्री 10 च्या सुमारास महल्ले हे टोल नाक्यावरील पोलीस चौकीत ड्युटीवर आले. त्यानंतर ते चौकीमागे गेले. ते खूप वेळ होऊनही परतले नसल्याने त्यांचा सहकारी चौकीमागे गेला. त्यावेळी महल्ले हे गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आले. त्यामुळे त्यांना तात्काळ बडनेरा रोड वरील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठ ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले.