दुर्बिणद्वारे 'अपेंडिक्स'ची यशस्वी शस्त्रक्रिया
By Admin | Updated: February 8, 2015 23:28 IST2015-02-08T23:28:18+5:302015-02-08T23:28:18+5:30
अपेंडिक्सवरील शस्त्रक्रियादेखील कठीण नाही. परंतु ही शस्त्रक्रिया करताना यापूर्वी तीन ठिकाणी चिरे द्यावे लागत होते. आता अगदी छोटासा एकच चिरा देऊन बालकाच्या पोटातील अपेंडिक्स

दुर्बिणद्वारे 'अपेंडिक्स'ची यशस्वी शस्त्रक्रिया
अमरावती : अपेंडिक्सवरील शस्त्रक्रियादेखील कठीण नाही. परंतु ही शस्त्रक्रिया करताना यापूर्वी तीन ठिकाणी चिरे द्यावे लागत होते. आता अगदी छोटासा एकच चिरा देऊन बालकाच्या पोटातील अपेंडिक्स दुर्बिणद्वारे बाहेर काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया स्थानिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या चमुने पार पाडली. मुंबई, पुण्याच्या धर्तिवर अमरावती येथे प्रथमच अशा पध्दतीची शस्त्रक्रिया पार पडली.
दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेचे तंत्रज्ञान अमलात आल्यानंतर अनेक किचकट शस्त्रक्रिया सोप्या झाल्या आहेत. शस्त्रक्रियेमुळे होणारी शारीरिक ईजा कमी झाल्याने रूग्णांची शस्त्रक्रियेची भीती कमी झाली आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांना रुग्णाच्या पोटाला तीन ठिकाणी छोटे चिरे द्यावे लागत असत. मात्र एकाच ठिकाणी छोटा चिरा देऊन प्रथमच शस्त्रक्रिया करण्यात आली. सुपर स्पेशालिटीचे वैद्यकीय अधीक्षक श्यामसुंदर निकम यांच्या मार्गदर्शनात बाल शल्यचिकित्सक आशिष झडपे, भुपेश पारडकर यांनी ८ वर्षीय बालकावर ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.
शहरातील पाटीपुरा येथील रहिवासी हर्षद खान या बालकाला अपेंडिक्स असल्यामुळे त्याचे पोट नेहमी दुखत होते. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. गुरुवारी दुपारी हर्षद खानची अपेंडिक्सची शस्त्रक्रिया पार पाडली. त्याच्या बेंबीखाली एक छोटासा चिरा देऊन दुर्बीणच्या साहाय्याने त्यांच्या पोटातील अपेंडिक्स बाहेर काढण्यात आला. सद्यस्थितीत हर्षद रुग्णालयात उपचार घेत आहे. बाल शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनात भूलतज्ज्ञ संजय महतपुरे, परिचारिका रोहिणी हाडोळे, पागोटे, पुष्पा घागरे, गायत्री व ज्योती यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)