ग्रामपंचायतीमधील विषय समित्या नामधारीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:14 IST2021-09-21T04:14:46+5:302021-09-21T04:14:46+5:30

अमरावती : गावाच्या विकासात लोकांच्या निर्णयाचा सहभाग असावा या चांगल्या उद्देशाने ग्रामपंचायत सदस्यांसाठी विविध आदर्श विषय समित्या तयार करून ...

Subject committees in the gram panchayat are nominal | ग्रामपंचायतीमधील विषय समित्या नामधारीच

ग्रामपंचायतीमधील विषय समित्या नामधारीच

अमरावती : गावाच्या विकासात लोकांच्या निर्णयाचा सहभाग असावा या चांगल्या उद्देशाने ग्रामपंचायत सदस्यांसाठी विविध आदर्श विषय समित्या तयार करून गावाच्या विकासाला हातभार लागावा म्हणून कार्यान्वित केल्या आहेत. परंतु, अनेक ग्रामपंचायत स्तरावर काही समित्यांचा अपवाद सोडला तर बहुतांश समित्यांची स्थापना करण्यात आलेली नाही. याकडे शासन व प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

ग्रामपंचायतीला मिळालेल्या अधिकाराच्या बाबतीत लोकनियुक्त विरोधी प्रतिनिधी म्हणजेच ग्रामपंचायतीच्या कार्याबद्दल उदासीन असतात. त्यासाठी शासनाकडून वेळोवेळी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून त्यांच्या कार्याची जाणीव करण्याची कामे करत होती. परंतु, अलीकडे तशी प्रशिक्षण शिबिरे बंद झाली आहेत. गावातील नागरिकांची जबाबदारी आणि विश्वासातील संस्था म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. ग्रामपंचायतीच्या कार्यालयात विविध जबाबदाऱ्या व अधिकार दिले आहेत. सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या विविध समित्या स्थापन करून त्यांची कार्ये निश्चित केली आहेत .त्यात बांधकाम समिती, पाणीपुरवठा व स्वच्छता समिती, ग्राम आरोग्य समिती, सामाजिक अंकेक्षण समिती, लेखापरीक्षण, बालहक्क संरक्षण, हुंडा प्रतिबंधक समिती, वन हक्क समिती, ग्राम दक्षता, ग्राम कृषी विकास, नानाजी देशमुख कृषी संजीवनी समिती, जैव विविधता समिती अशा समित्या स्थापन करून त्यांची कार्ये निश्चित केली आहेत. त्यात बांधकाम समिती, पाणीपुरवठा समिती, रस्ते विकास समिती, शालेय शिक्षण समिती, आरोग्य व स्वच्छता समिती, दक्षता समिती, तंटामुक्त समिती, संयुक्त पर्यावरण समिती, अशा विविध समित्या ग्रामपंचायतीला निर्माण करून या समित्या गावातील मूलभूत कामकाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतात. परंतु, या समित्या फक्त नामधारीच असल्याचे दिसून येत आहे.

कोट

ग्रामपंचायत स्तरावर स्थापन करावयाच्या विविध समित्या आहेत. आतापर्यंत बहुतांश समिती स्थापन करण्यात आला होत्या. परंतु, आता नव्याने या समित्यांची स्थापना करावयाची आहे. परंतु, कोरोना संसर्गामुळे ग्रामसभा होऊ शकल्या नाहीत. ग्रामसभा घेण्याबाबतचे शासनाचे आदेश येताच या समित्यांची स्थापना केली जाणार आहे.

कमलाकर वनवे

जिल्हाध्यक्ष ग्रामसेवक युनियन

Web Title: Subject committees in the gram panchayat are nominal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.