विषय समितीची निवड प्रोसिडिंग पेंडिंगच

By Admin | Updated: March 18, 2015 00:26 IST2015-03-18T00:26:51+5:302015-03-18T00:26:51+5:30

जिल्हा परिषदेच्या चार विषय समितींसाठीची १२ डिसेंबर २०१४ रोजीपार पार पडलेल्या विषय समितीचे सभागृहातील प्रोसिडींग ...

The subject committee selection process pending | विषय समितीची निवड प्रोसिडिंग पेंडिंगच

विषय समितीची निवड प्रोसिडिंग पेंडिंगच

अमरावती : जिल्हा परिषदेच्या चार विषय समितींसाठीची १२ डिसेंबर २०१४ रोजीपार पार पडलेल्या विषय समितीचे सभागृहातील प्रोसिडींग अद्यापही पेडींग असृन त्याला मंजूरी न मिळाल्याने सध्या जिल्हा परिषदेचे प्रसानन त्यामुळे बुचकळयात पडले आहे.
निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित समितीवरील सदस्य निवड प्रक्रियेचा प्रस्ताव एकीकडे प्रलंबीत असताना दुसरीकडे प्रोसिडींग मंजूर न झाल्याने ही सर्व प्रकीयाच आता अडचणीत येण्या शक्यता बळावली आहे.जिल्हा परिषदेच्या दहा विषय समितींमध्ये मागील १२ डिटेंबर रोजी पहिली विशेष सभा घेण्यात आली यावेळी ही निवड प्रक्रीया शासन धोरणाच्या ८१ (१) नुसार राबविण्यात आली . दरम्यान या निवडणूकीत एकूण विषय समितीमधील १७ जागेसाठी १९ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सभापती यांचे समिती सदस्यासाठी अर्ज प्राप्त झाले होते . यामधून वित्त समितीवर जयप्रकाश पटेल, अर्चना मुरूकर यांची तर पशुसंवर्धन समितीवर. प.स. सभापती अशोक मावस्कर, महिला बालकल्याण समितीवर नांदगावच्या सभापती शोभा इंगोले, मोर्शी पंचायत समितीच्या सभापती पदमा पांचाळे, यांची अविरोध निवड करण्यात आली.याशिवाय जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीवर महेंद्रसिग गैलवार, बापुराव गायकवाड, यांची समाज कल्याण समितीवर दर्यापुरच्या सभापती रेखा वाकपांजार, चांदुर बाजार येथील सभापती अर्चना अवसरमोल आदी सदस्य वरील समितीवर अविरोध निवड करण्यात आली आहे.मात्र यासाठी घेण्यात आलेल्या सभेचे प्रोसिडिंग अद्याप पर्यतही मंजूर न केल्याने निवड पात्र समितीचे सदस्य ज्या समितीवर निवडले गेले ते सभेत कुठल्या आधारावर सहभाग घेत आहेत.हा मुद्दा सद्या जिल्हा परिषदेत चर्चेचा झाला आहे.या सभेततील प्रोसिडिंग मागील दोन महिन्या पासून का पेडींग आहे . यामागील कारण मात्र समजृ शकले नाही. हा विषय संपत नाही तोच १६ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेत उर्वरित समितीवरील सदस्य निवडीसाठी बोलविण्यात आली सभा ऐन वेळी सभागृहाचे पीठासिन सभापती यांनी विभागीय आयलक्तांचे पत्रानुसार रद्द करून याबाबत निवड प्रक्रीयेसाठी विभागीय आयुक्तांचे मार्गदर्शन मागविण्याचे सांगीतले. प्रोसिडिंग सुध्दा पेडींग आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The subject committee selection process pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.