स्थायीसह विषय समित्यांच्या बैठका पुन्हा ऑनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:13 IST2021-05-13T04:13:23+5:302021-05-13T04:13:23+5:30
अमरावती : कोरोना संसर्गाची होणारी वाढ लक्षात घेता. यापुढे जिल्हा परिषद, नगरपंचायतीसह महापालिकांच्या स्थायी समिती व विषय समितीची बैठक ...

स्थायीसह विषय समित्यांच्या बैठका पुन्हा ऑनलाईन
अमरावती : कोरोना संसर्गाची होणारी वाढ लक्षात घेता. यापुढे जिल्हा परिषद, नगरपंचायतीसह महापालिकांच्या स्थायी समिती व विषय समितीची बैठक ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबतचे आदेश राज्य शासनाने नुकतेच दिले आहेत.
शासनाने आधीच देताना कोविड -१९ संदर्भातील उपाययोजनांसाठी अत्यंत अपरिहार्य कारणास्तवच स्थायी समिती व विषय समित्यांच्या बैठक घेणे आवश्यक असल्यास ती प्रत्यक्ष घ्यावी. अन्यथा इतर कारणासाठीच्या सर्व बैठका या ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात असेही स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे गत वर्षभरात जिल्हा परिषदेच्या मुख्य सर्वसाधारण सभा आणि ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत होत्या. मात्र विषय समित्यांच्या व स्थायी समितीची बैठक की प्रत्यक्ष होत होती. परंतु आता यापुढे सदर आदेशामुळे या सर्व बैठका सभा ऑनलाईन घेणे बंधनकारक राहणार आहे.
बॉक्स
सर्व सभा आनलाईन
स्थायी समितीची बैठक ऑनलाइन घेण्याबाबत राज्य शासनाकडून सूचना आल्या आहेत. त्या अनुषंगाने यापुढे स्थायी समितीची बैठक घेण्याबाबत प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय इतरही बैठकी सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग असल्यामुळे ऑनलाइन घेतल्या जाणार आहेत.