दखल : जिल्हा परिषदेत १२ जानेवारी होणार विशेष सभाअमरावती : जिल्हा परिषदेच्या विषय समिती सदस्य पदाचा वाद आता चांगलाच ऐरणीवर आला आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षांसह दोन माजी सभापतींनी अध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालन्यात भजन करण्याचा इशारा दिला होता. याबाबत लोकमतने २ जानेवारी राजी वृत्त प्रकाशित करताच या वृत्ताची दखल जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. याच मुद्यावर आता विषय समित्यांचा वाद सोडविण्यासाठी गुरूवारी १२ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेत विषय समितीचा निकाल लावला जाणार आहे.जिल्हा परिषदेत विषय समितीच्या रिक्त पदावर निवडणूक प्रक्रियेसाठी मागील वर्ष भरापासून सातत्याने सत्ताधाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे माजी अध्यक्ष सुरेश ठाकरे, माजी आरोग्य सभापती मनोहर सुने तसेच माजी समाज कल्याण सभापती चंद्रपाल तुरकाने यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या दालनात भजन आंदोलन करण्याचा इशारा दिला होतो. विषय समिती पासून जिल्हा परिषदेचे माजी पदाधिकारी व पंचायत समितीचे सभापती मागील वर्ष भरापासून प्रतिनिधीत्वापासून वंचित होते. नियमानुसार जिल्हा परिषदेच्या माजी पदाधिकाऱ्यांना तसेच पंचायत समितीच्या विद्यमान सभापतींना कुठल्याही एका समितीवर सदस्यसत्व देणे अनिवार्य आहे. मात्र सत्ताधाऱ्यांकडून या प्रक्रियेत टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप या माजी पदाधिकाऱ्यांनी केला होताा. यामुळे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष, माजी सभापती व पंचायत समितीचे सभापती सदस्य पदापासून वंचित राहिले आहेत. समितीमध्ये प्रतीनिधित्व नसल्याने ग्रामीण भागातील समस्या मांडता येत नाहीत. त्यामुळे हा अन्याय किती दिवस सहन करायचा, असा प्रशन या पदाधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांना केला होता. त्यामुळेच न्यायासाठी येत्या ११ जानेवारी रोजी अध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर भजन सत्याग्रह करण्याचा निर्णय या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच याची दखल जिल्हा परिषद पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळेच विषय समितीचा वाद आता १२ जानेवारी रोजी निकाली काढण्यासाठी जिल्हा परिषदेची विशेष सभा होणार आहे. (प्रतिनिधी)
विषय समितीचा वाद गुरूवारी सुटणार
By admin | Updated: January 4, 2016 00:19 IST