उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेतला जलयुक्त शिवाराचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2017 00:13 IST2017-03-19T00:13:04+5:302017-03-19T00:13:04+5:30
शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनांपेकी एक असलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या....

उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेतला जलयुक्त शिवाराचा आढावा
पदधिकाऱ्यांची उपस्थिती : दोन्ही तालुक्यातील अधिकारी उपस्थित
दर्यापूर : शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनांपेकी एक असलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या सन २०१६-१७ च्या विकासात्मक कामांचा आढावा दर्यापूरचे उपविभागीय अधिकारी विजय राठोड यांनी बुधवारी घेतला. आढावा सभेला दर्यापूर- अंजनगाव तालुक्यातील महसूल, कृषी व इतर विभागाचे अधिकारी तसेच राजकीय पदधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली होती.
येथील माहेश्वरी भवनात आढावा सभा घेण्यात आली. व्यासपीठावर तहसीलदार राहुल तायडे, अंजनगाव सुर्जीचे तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, गटविकास अधिकारी अरविंद गुडधे, तालुका कृ षी अधिकारी विनोद लंगोटे, अंजनगावाचे कृषी अधिकारी विवेक टेकाडे, जिल्हा परिषद सदस्य सुनील डिके, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल चव्हाण पंचायत समितीचे सभापती गजानन देवतळे, उपसभापती राजू कराळे, अंजनगाव पंचायत समितीचे उपसभापती महेश खारोडे आदी उपस्थिती होेती.
यावेळी उपविभागीय अधिकारी विजय राठोड यांनी सभेचे आढावा घेतला. दर्यापूर तालुक्यात मागेल त्यांना शेततळेअंतर्गत १४४९ अर्ज प्राप्त झालेत.
११०० शेततळे पूर्ण करण्याचे यावर्षीचे उद्दिष्ट आहे. यावेळी २०१६-१७ व २०१७-१८ च्या कामांचा आढावा घेण्यात आला. दर्यापूर तालुक्यातील १६ व अंजनगाव तालुक्यातील १४ गावांची जलयुक्त शिवार अभियानासाठी निवड करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार राहुल तायडे यांनी केले. उपविभागीय अधिकारी विजय राठोड यांनी उपस्थिांना मार्गदर्शन केले. यावेळी तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी व संबंधित विभागाचे दोन्ही तालुक्यांतील कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)