बच्चू कडूंद्वारा उपजिल्हा रुग्णालयाची झाडाझडती

By Admin | Updated: October 5, 2016 00:22 IST2016-10-05T00:22:25+5:302016-10-05T00:22:25+5:30

अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील स्वच्छता रंगरंगोटी व ठिकठिकाणी पानविडे, गुटखा, खाऊन थुंकणाऱ्यांचा ...

Sub-district Hospital Plant By Bachhu Kadu | बच्चू कडूंद्वारा उपजिल्हा रुग्णालयाची झाडाझडती

बच्चू कडूंद्वारा उपजिल्हा रुग्णालयाची झाडाझडती

मागणी : परिचारिकांना परत पाठवा, अन्यथा निलंबित करा
नरेंद्र जावरे परतवाडा
अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील स्वच्छता रंगरंगोटी व ठिकठिकाणी पानविडे, गुटखा, खाऊन थुंकणाऱ्यांचा खरपूस समाचार घेत प्रतिनियुक्तीसह स्थानांतरित झालेल्या परिचारिकांना परत पाठवा, अन्यथा निलंबित करण्याचा इशारा देत आ. बच्चू कडू यांनी मंगळवारी रुग्णालयाची झडाझडती घेतली.
उपजिल्हा रुग्णालयात एका नियोजित कार्यक्रमात मंगळवारी दुपारी १२ वाजता आ. कडू आले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी रुग्ण भारती विभागात जावून काही रुग्णांशी संवाद साधला, त्यांना मिळणाऱ्या सुविधा मिळत आहे किंवा नाही याची माहिती घेतली. उपजिल्हा रुग्णालयासाठी काय करता येईल, याबाबत उपस्थित वैद्यकीय अधीक्षक जाकीर यांचेसोबत चर्चा केली.
अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात कामाचा वाढता ताण पाहता येथे कर्मचारी-परिचारिकांचे रिक्त पदे अतिरिक्त कामाच्या ताणामुळे परिचारिका स्वत:च आजारी पडत असल्याचे चित्र आहे.
महिन्याकाठी बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची नोंद १७८६६ एवढी तर आंतर (भरती) रुग्ण संख्या दीड हजारांवर आहे. परिणामी कामाचा ताण वाढला आहे.
भिंतीवर लावा महापुरुषांचे फोटो
रुग्णालयाची झडाझडती घेताना आतील भिंतीसह कोपऱ्यात पान, गुटखा खाउन थुंकल्याचे दिसून येताच आ. बच्चू कडू यांनी थुंकणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. तेथे रंगरंगोटी झाल्यावर महापुरुषांचे चित्र लावण्याचे आदेश केले. त्यातून थुंकणाऱ्यांना आळा बसेल व अंतर्गत भिंतीवर काच पूर्ण रुग्णालयात रंगरंगोटी करण्याचे आदेश सा.बां.चे उपअभियंता प्रमोद भिलपवार, गोपाल बकाले, झाडे आदिंना दिले.

कारवाई न झाल्यास ठिय्या आंदोलन
अचलपूर उपजिल्हा रुग्णालय शंभर खाटांचे आहे. येथे परिचारिकांचे २७ पदे मंजुर आहेत. यापैकी २१ परिचारिका कार्यरत असून सहा पदे रिक्त आहेत. त्यावरही कळस म्हणजे अगोदरच रिक्त जागांवर परिचारिका आल्या नाही आणि पुन्हा दोघींना अमरावती येथे प्रतिनियुक्तीवर देण्यात आले. परिणामी येथे मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या पाहता. तत्काळ परिचारिकांना रुजु करण्याचे आदेश द्या, अन्यथा निलंबित करण्याच्या सूचना आमदार कडू यांनी आरोग्य उपसंचालकांना देत कारवाई दोन दिवसांत न झाल्यास उपजिल्हा रुग्णालयात ठिय्या मांडण्याचा इशारा दिला. परिणामी आरोग्य यंत्रणेत एकच खडबळ आहे.

Web Title: Sub-district Hospital Plant By Bachhu Kadu