शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

‘स्टंट राईडर’चा शहरात पुन्हा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 00:24 IST

‘धूम स्टाइल’ने बाईक पळविणाºया स्टंटबाजांनी तीन दुचाकींना कट मारल्याने पाच जण जखमी झाले. स्टंट राईडरचा हा धुमाकूळ रविवारी अमरावती ते बडनेरा रोडवर पाहायला मिळाला.

ठळक मुद्देतीन दुचाकींवरील पाच जण जखमी : अमरावती-बडनेरा रोडवरील घटना

आॅनलाईन लोकमतअमरावती : ‘धूम स्टाइल’ने बाईक पळविणाºया स्टंटबाजांनी तीन दुचाकींना कट मारल्याने पाच जण जखमी झाले. स्टंट राईडरचा हा धुमाकूळ रविवारी अमरावती ते बडनेरा रोडवर पाहायला मिळाला. जखमींना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अद्यापपर्यंत या अपघाताविषयी तक्रार करण्यात आलेली नाही.शहरातील बालाजीनगरातील रहिवासी भारत बघेल हे पत्नी कविता व पुतण्या गिरीराजला घेऊन दुचाकीने रविवारी बडनेरा रोडवरील एका शॉपिंग मॉलमध्ये जात होते. दरम्यान, दुपारी ३ वाजताच्या सुमारास सातुर्णाजवळ भरधाव दुचाकीस्वार स्टंट राइडिंग करीत धुमाकूळ घालत होता. त्यांच्या दुचाकीपर्यंत पोहोचताच स्टंट राइडर कट मारून भरधाव बडनेराच्या दिशेने निघून गेला. मात्र, बघेल यांचे दुचाकीवरील नियंत्रण गेल्याने त्यांची दुचाकी रस्त्याच्या मधोमध दुभाजकावर आदळली. या अपघातात भारत बघेल, कविता बघेल व गिरीराज जखमी झाला. काही नागरिकांनी बघेलसह त्यांच्या कुटुंबीयांची मदत करून तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. याच अपघाताप्रमाणे या स्टंटबाजांनी रस्त्यावरील आणखी दोन दुचाकीस्वारांना कावा मारून खाली पाडले. त्यांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा प्रकार रोखण्याची मागणी करण्यात आली आहे.स्टंटबाजांचा दुसरा कारनामाकल्याणनगरातील रहिवासी धनंजय महादेव माहुरकर हे रविवारी रात्री ११.३० वाजता त्यांच्या कार (एमएच २७ एटी-५१५२) ने गोपालनगरहून दस्तुरनगर मार्गाकडे जात होते. दरम्यान, एमआयडीसी रोडवर त्याच्या कारसमोर स्टंटबाजी करीत पाच ते सहा जणांनी दुचाकी उभ्या केल्या. त्यांना कारच्या बाहेर काढून शिवीगाळ करीत मारहाणसुद्धा केली. या घटनेची तक्रार राजापेठ पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. या स्टंट राइडरमध्ये एमएच २७ एव्ही-४२० या दुचाकी क्रमांकांचा समावेश असल्याचे माहुरकर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.