दर्यापूर पोलीस ठाण्यात अभ्यासिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:22 IST2021-02-05T05:22:24+5:302021-02-05T05:22:24+5:30
फोटो पी ०२ दयार्पूर दर्यापूर : जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांच्या संकल्पनेतून येथील पोलीस ठाण्यात उभारण्यात आलेल्या ...

दर्यापूर पोलीस ठाण्यात अभ्यासिका
फोटो पी ०२ दयार्पूर
दर्यापूर : जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांच्या संकल्पनेतून येथील पोलीस ठाण्यात उभारण्यात आलेल्या अभ्यासिकेचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. परिसरातील विद्यार्थ्यांना या अभ्यासिकेचा लाभ होणार असून, अशा प्रकारचा उपक्रम जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात राबविण्यात यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
आमदार बळवंत वानखडे, नगराध्यक्ष नलिनी भारसाकळे, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती बाळासाहेब हिंगणीकर, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुधाकर भारसाकळे, जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन, तहसीलदार योगेश देशमुख, अभिजित देवके, सुनील गावंंडे, शिवाजी देशमुख उपस्थित होते. प्रास्ताविक ठाणेदार प्रमेश आत्राम यांनी केले. संचलन लक्ष्मण जाधव यांनी केले.
--------------------------------------------
चांदूर बाजार पोलीस ठाण्यात अभ्यासिका
चांदूर बाजार : येथील पोलीस ठाण्याच्या परिसरात डॉ. एपीजे अब्दुल कलाम बहुउद्देशीय सभागृह व वाचन अभ्यासिकेचा शुभारंभ राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष नितीन कोरडे, पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन., तहसीलदार धीरज स्थूल, एसडीपीओ पोपटराव अबदागिरे, पोलीस निरीक्षक सुनील किनगे आदी उपस्थित होते. पोलीस ठाणे परिसरात अभ्यासिका असल्याने विद्यार्थी सुरक्षित वातावरणात अभ्यास करतील. त्यामुळे त्यांनी एकाग्रतेने अभ्यास करून यश प्राप्त करावे, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
---------------------