शिक्षकांच्या ऑनलाईन वेतनासाठी अभ्यास समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:12 IST2021-05-23T04:12:07+5:302021-05-23T04:12:07+5:30

अमरावती : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत १४ तालुक्यांत ५,९३२ प्राथमिक शिक्षक कार्यरत आहेत. या दरमहा दिले जाणारे ...

Study Committee for Online Salary of Teachers | शिक्षकांच्या ऑनलाईन वेतनासाठी अभ्यास समिती

शिक्षकांच्या ऑनलाईन वेतनासाठी अभ्यास समिती

अमरावती : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत १४ तालुक्यांत ५,९३२ प्राथमिक शिक्षक कार्यरत आहेत. या दरमहा दिले जाणारे वेतन ऑफलाईन पध्दतीने अदा केले जात आहे. ही प्रक्रिया डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे यापुढे शिक्षकांचे वेतन ऑनलाईन सीएमपी प्रणालीने देण्याच्या अनुषंगाने शिक्षण सभापतीच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती गठित केली आहे.

ही समिती ज्या जिल्ह्यात झेडपी शिक्षकांचे वेतन ऑनलाईन प्रणालीव्दारे केले जात आहे.त्या जिल्ह्यात जाऊन ही प्रक्रिया कशा पध्दतीने राबविली जाते याचा अभ्यास करण्यासाठी दौरा करणार आहे. यासंदर्भात स्थायी समितीने ठराव घेतला. यावर अध्यक्ष बबलू देशमुख यांनी शिक्कामोर्तब केले आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या अखत्यारित १४ तालुक्यात ५,९३२ हून अधिकारी शिक्षक कार्यरत आहेत. या शिक्षकांना दरमहा सीएमपी प्रणालीव्दारे वेतन अदा करण्याचे शासनाआदेश आहेत. मात्र, ही प्रक्रिया अद्यापही जिल्हा परिषदेमार्फत राबविली जात नाही. त्यामुळे शिक्षकांचे वेतन एक ते दाेन महिने मिळत नाही. वेतनालाही बराच वेळ लागतो. त्यामुळे ऑफलाईन पध्दतीने वेतन देण्याची पध्दत गुंडाळण्याची तयारी जिल्हा परिषदेने चालविली आहे. याऐवजी सीएमपी प्रणालीने वेतन देण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. यावेळी वेतनाची प्रक्रिया सुटसुटीत आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. याकरिता झेडपी स्थायी समितीने यापुढे सीएमपी प्रणालीने वेतन देण्यासाठीची प्रक्रिया कशी राबविली जाते त्याकरिता काय उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्य बाबींचा अभ्यास करण्यासाठी पाच जणांची समिती लवकरच ज्या जिल्हा परिषदेत ही प्रक्रिया ऑनलाईन राबविली जात आहे त्या ठिकाणी जाऊन माहिती घेणार आहे. यानंतर येथील झेडपीत हीच प्रक्रिया राबवून शिक्षकांचे वेतन ऑनलाईन केले जाणार आहे.

बॉक्स

पाच जणांची समिती

जिल्हा परिषद स्थायी समितीने शिक्षकांच्या वेतनासाठी सीएमपी प्रणाली सुरू करण्याचे अनुषंगाने शिक्षण सभपाती सुरेश निमकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे, प्राथमिक शिक्षणाधिकारी एजाज खान व अन्य दोन अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. या समितीचा झेडपीमार्फत १५ दिवसांत दौरा होणार आहे.

Web Title: Study Committee for Online Salary of Teachers