चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात अभ्यासिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:23 IST2021-02-05T05:23:22+5:302021-02-05T05:23:22+5:30

फोटो पी ३१ चांदूररेल्वे चांदूर रेल्वे : स्थानिक पोलीस ठाण्यात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अभ्यासिका उभारण्यात आली आहे. त्या ...

Study at Chandur Railway Police Station | चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात अभ्यासिका

चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात अभ्यासिका

फोटो पी ३१ चांदूररेल्वे

चांदूर रेल्वे : स्थानिक पोलीस ठाण्यात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अभ्यासिका उभारण्यात आली आहे. त्या अभ्यासिकेचे उद्घाटन अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रशेखर मिणा यांच्या हस्ते पार पडले.

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विद्यार्थ्यांना एक ठिकाण दिले आहे, जेथे टॅलेंट अपग्रेड करू शकता. विद्यार्थ्यांना स्वत:च्या दारावर अभ्यासिका आणून दिली आहे, असे प्रतिपादन मिणा यांनी येथे केले. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. तसेच प्रमुख अतिथी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, आयपीएस निकेतन कदम, आयपीएस श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव आदींची उपस्थिती होती. ही अभ्यासिका विद्यार्थ्यांकरीता निशु:ल्क उपलब्ध असेल.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरावरील पोलीस ठाण्यात अभ्यासिका करणारा अमरावती जिल्हा हा पहिलाच जिल्हा ठरला आहे. विद्यार्थ्यांमध्ये एक सुरक्षितता निर्माण व्हावी व पोलिसांप्रति भीती दूर व्हावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. जिल्ह्यात सर्व पोलीस ठाण्यांमध्ये हा उपक्रम राबविणार आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले. सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन नरेश कावलकर यांनी केले. ठाणेदार मगन मेहते यांच्यासह विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, ज्योतिबा फुले अभ्यासिकेतील विद्यार्थी, शहरवासी उपस्थित होते.

Web Title: Study at Chandur Railway Police Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.