७०,४३० विद्यार्थ्यांचा स्वाध्यायवर अभ्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:13 IST2021-04-07T04:13:21+5:302021-04-07T04:13:21+5:30
२० आठवडा पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना व्हाॅट्सॲपवर उपक्रम अमरावती : कोरोनामुळे शाळा बंद आहेत. परिणामी विद्यार्थ्याना ऑनलाईन शिक्षणाचा आधार ...

७०,४३० विद्यार्थ्यांचा स्वाध्यायवर अभ्यास
२० आठवडा पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना व्हाॅट्सॲपवर उपक्रम
अमरावती : कोरोनामुळे शाळा बंद आहेत. परिणामी विद्यार्थ्याना ऑनलाईन शिक्षणाचा आधार घ्यावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्यांच्याकडून स्वाध्याय सोडवून घेण्यात येत आहेत. जिल्ह्यातील ४ लाख ३६ हजार ६० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ‘स्वाध्याय’च्या माध्यमातून ७० हजार ४३० विद्यार्थ्यांनी अभ्यास करीत आहेत.
कोरोनाचा वाढता संसर्ग वाढल्यानंतर शासनाने शाळा,महाविद्यालये बंद ठेवली आहेत. या संकटामुळे ऑंनलाईन शिक्षणाचा पर्याय पुढे आला. परंतु, या शिक्षण पद्धतीतील त्रुटींचा अनेकांना फटका बसत असल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय सोडविण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. सुरुवातीला याकरिता नोंदणी करणे आवश्यक होते. त्यानुसार जिल्हाभरातील बऱ्यापैकी नोंदणी केली. आजघडीला २० वा स्वाध्याय सुरू आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची संख्या ४ लाख ३६ हजार ६० एवढी आहे. यापैकी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी स्वाध्याय सोडविले जावेत, यासाठी शाळा तसेच शिक्षकांकडून प्रयत्न करण्यात आले. त्याचाच परिणाम म्हणून की काय, नियमित स्वाध्याय सोडविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७० हजार ४३० वर जाऊन पोहोचली आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रातील १४८८९, चांदूर रेल्वे ७५२१, अचलपूर २६५६, भातकुली ६९००, चांदूर बाजार ४००४, अंजनगाव सुर्जी १४६६, चिखलदरा १८३७ याप्रमाणे सर्वच तालुक्यांतील विद्यार्थ्यांनी स्वाध्याय सोडविले आहेत.
बाॅक्स
अशी आहे आकडेवारी
जिल्ह्यातील विद्यार्थिसंख्या ४३६०६०
स्वाध्याय मिळविणारे विद्यार्थी ७३५९८
स्वाध्याय साेडविणारे विद्यार्थी ७०४३०
बॉक्स
मराठी, विज्ञान, उर्दू माध्यम
कोरोनाकाळात अनेक शाळांनी ऑनलाईन अभ्यासक्रमांवर भर दिला. त्यामुळे विद्यार्थ्यांचा घरीच अभ्यास व्हावा, यासाठी स्वाध्याय व्हाॅट्सॲपद्वारे सोडविण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये मराठी, विज्ञान, उर्दू आदी माध्यमांचा समावेश असून, दर आठवड्याला नवीन प्रश्न दिले जातात.
बॉक्स
जिल्ह्यातील प्रभावी अंमलबजावणी
जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत स्वाध्याय उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत ७० हजार ४३० विद्यार्थ्यांनी स्वाध्याय पूर्ण केला आहे. जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न आहेत.
बॉक्स
विद्यार्थी म्हणतात
कोरोनामुळे शाळा बंद असल्याने शिक्षकांनी स्वाध्याय उपक्रमाच्या लिंक ग्रुपवर शेअर केले आहेत. दर आठवड्याला नवीन प्रश्न असल्याने अभ्यासाची उजळणी होत आहे. आतापर्यंत २० स्वाध्याय पूर्ण झाले आहेत.
- देवांश्री बागडे, विद्यार्थिनी
कोट
प्रत्येक विषयाशी निगडीत प्रश्न विचारले जातात. त्यामुळे परीक्षेची तयारी होत आहे. शाळेत स्वाध्याय उपक्रमात सर्व मित्र यामध्ये सहभागी आहोत. घरीच प्रश्नमालिका सोडवायला मिळत असल्याने सराव होत आहे. त्यामुळे परीक्षेला मदत होईल.
- जीवन कावरे, विद्यार्थी
कोट
ऑफलाईन शिक्षण बंद आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा भाग म्हणून राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे किंवा पालकांकडे स्मार्ट फोन आहे, असे विद्यार्थ्यी ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घेत आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, हाच शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे.
ई.झेड. खान, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)