शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आता शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी, पालकांसह प्राचार्यांचे हमीपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 16:06 IST

अगोदर आॅनलाइन नंतर आॅफलाइन, असा प्रवास करणा-या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी आता पात्र विद्यार्थ्यांना आई-वडिलांसह प्राचार्यांचे हमीपत्र देणे अनिवार्य असेल. याबाबत नवे शासन परिपत्रक निर्गमित झाले आहे. मात्र, सन २०१७-२०१८ हे शैक्षणिक वर्ष संपायला उणेपुरे दोन महिने शिल्लक असताना विद्यार्थ्यांना एक छदमाही मिळाला नाही, हे विशेष.

- गणेश वासनिक

अमरावती : अगोदर आॅनलाइन नंतर आॅफलाइन, असा प्रवास करणा-या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी आता पात्र विद्यार्थ्यांना आई-वडिलांसह प्राचार्यांचे हमीपत्र देणे अनिवार्य असेल. याबाबत नवे शासन परिपत्रक निर्गमित झाले आहे. मात्र, सन २०१७-२०१८ हे शैक्षणिक वर्ष संपायला उणेपुरे दोन महिने शिल्लक असताना विद्यार्थ्यांना एक छदमाही मिळाला नाही, हे विशेष.विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाने ९ जानेवारी २०१८ रोजी शासन परिपत्रक जारी करून केंद्र व राज्य पुरस्कृत शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आदी योजनांचे निकष ठरविले आहे. शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा, यासाठी शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरून आॅनलाईन अर्ज मागविले. परंतु, या व्यवस्थेत तांत्रिक त्रुटी असल्याने आॅनलाईन शिष्यवृत्तीचा बोजवारा उडाला. त्यामुळे सन २०१७-२०१६ या शैक्षणिक वर्षातील पहिल्या सहामाहीकरीता देय असलेले शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व निर्वाह भत्त्याची अनुज्ञेय रक्कम वितरीत करण्याबाबत शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. शिष्यवृत्ती वाटपात गैरव्यवहार होऊ नये, यासाठी समाजकल्याणचे प्रादेशिक उपायुक्तांवर विशेषत्वाने जबाबदारी सोपविली आहे. नव्या शासन परिपत्रकात शिष्यवृत्तीसाठी प्रतिज्ञापत्राचा नमुना दिलेला आहे. एका हमीपत्रावर विद्यार्थी, पालकांची स्वाक्षरी तर दुसºया हमीपत्रावर प्राचार्यांची स्वाक्षरी, महाविद्यालयाचा शिक्का आवश्यक आहे.

‘त्या’ दोषी संस्था, अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती नाहीशिष्यवृत्ती घोटाळ्याने समाजकल्याणची वाट लागली. विशेष चौकशी पथकाने शिष्यवृत्ती घोटाळ्यात दोषी संस्था व अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती देता येत नाही, असे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे अशा दोषी संस्था, अभ्यासक्रमांना शिष्यवृत्तीचे वाटप करू नये, ही बाब नव्या शासन परिपत्रकात स्पष्ट केली आहे.शासन परिपत्रकातच ‘कल्याण’शिष्यवृत्ती वाटपाचे नवे निकष जारी करताना शासनाने ९ जानेवारी २०१८ रोजी परिपत्रक जारी केले आहे. मात्र, या नव्या परिपत्रकात वर्षाचा घोळ झाल्याची बाब निदर्शनास आली. ९ जानेवारी २०१८ ऐवजी २०१७ असा उल्लेख असल्याने हे परिपत्रक किती पारदर्शक आणि सत्य आहे, याविषयी समाजकल्याण अधिकाºयांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी