मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन
By Admin | Updated: September 30, 2014 23:30 IST2014-09-30T23:30:02+5:302014-09-30T23:30:02+5:30
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विभागीय क्रीडा व युवक महोत्सवाचा उद्घाटन सोहळा मंगळवारी शिवाजी शिक्षण महाविद्यालयात पार पडला. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कलागुणातून

मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन
अमरावती : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विभागीय क्रीडा व युवक महोत्सवाचा उद्घाटन सोहळा मंगळवारी शिवाजी शिक्षण महाविद्यालयात पार पडला. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कलागुणातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले तसेच विविध क्रीडा स्पर्धातून कलाकौशल्य सादर केले.
क्रीडा व युवक महोत्सवात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावी म्हणूनच युवा महोत्सवासोबतच क्रीडा स्पर्धाचे आयोजन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष वसंतराव चर्जन तर उद्घाटक म्हणून नाशिक मुक्त विद्यापीठाचे अंबादास मोहिते उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनसंचार संस्थाचे संचालक नदीम खान, शिवाजी शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य मीना रोकडे, अनिरुध्द गावंडे, कैलास बोरसे यांची उपस्थिती होती. भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्ज्वलन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकमध्ये अनिरुध्द गावंडे यांनी मुक्त विद्यापीठाची पार्श्वभूमी मांडली. अध्यक्षीय भाषणामध्ये चर्जन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कलागुणाना सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळाले आहे. या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला पाहिजे. देशभरात भाऊसाहेबांनी शिक्षणाचे बिजारोपण केले. त्यामुळे आज मुक्त विद्यापीठाने उंच भरारी घेतली आहे. युवा महोत्सवातून विद्यार्थ्यांसाठी चांगली संधी चालून आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी क्रीडा व महोत्सवात आपले कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरण करावे.
क्रीडा व युवा महोत्सवात कार्यक्रमानंतर शास्त्रीय गायन, पाश्चिमात्य गायन, लोकनृत्य, पोस्टर मेकिंग, स्पॉट फोटोग्राफी, एकांकीका, शास्त्रीय नृत्य, कोलाज रांगोळी स्पर्धा, वादविवाद स्पर्धा असे विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. त्याचप्रमाणे क्रीडा स्पर्धांमध्ये भाला फेक, थाळीफेक, गोळा फेक, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल अशा आदी स्पर्धा घेण्यात आल्या. उद्घाटनीय कार्यक्रमाचे संचालन खडसे, प्रास्तविक अनिरुध्द गावंडे व आभार प्रदर्शन के.बी. बोरसे यांनी केले. यावेळी भाऊसाहेब चौधरी, अंजली ठाकरे, गजानन गडीकर संगीता जवंजाळ, निखिलेश नलोडे, भोजराज चौधरी, विवेक गुल्हाने, विवेक जाधव आदी उपस्थित होते.