कोजागिरीच्या नावावर विद्यार्थ्यांची ओली पार्टी
By Admin | Updated: October 17, 2016 00:19 IST2016-10-17T00:19:47+5:302016-10-17T00:19:47+5:30
कौजागिरीच्या नावावर मद्यप्राशन करून ओली पार्टी झोडण्याचा प्रताप गाडगेनगर येथे भाड्याने राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला आहे.

कोजागिरीच्या नावावर विद्यार्थ्यांची ओली पार्टी
नागरिकांना टाकला घेराव : मारहाणीच्या भीतीने विद्यार्थी पळाले
संदीप मानकर अमरावती
कौजागिरीच्या नावावर मद्यप्राशन करून ओली पार्टी झोडण्याचा प्रताप गाडगेनगर येथे भाड्याने राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला आहे. डिजेच्या नावावर मद्य प्राशन करून विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. परंतु नागरिकांना हा त्रास सहन न झाल्याने नागरिकांनी ज्या ठिकाणी पार्टी सुरू होती, त्या घराला घेरावा घातला. मात्र नागरिकांच्या हस्ते बाजीरावचा प्रसाद बसण्याच्या भीतीने २० ते २५ विद्यार्थी मागील दाराने पळून गेले. ही घटना गाडगेनगर येथील पलाश गल्लीतील अंकुश डाहके यांच्या घरी घडली.
सविस्त असे की, गाडगेनगर येथील अंकुश विठ्ठल डाहाके यांच्या घर असून त्यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना खोल्या भाड्याने दिल्या आहेत. एका खोलीत चार ते सहा मुले राहतात. यामध्ये हा विद्यार्थी तर काही व्यवसाहीकही आहेत. येथे घरमालक राहत नसल्यामुळे व ठिकाणी घरमालकाचे विद्यार्थ्यांनावर कुठलेही नियंत्रण नसल्यामुळे मुलाने मोकळीकता मिळते. त्यामुळे त्यांनी कौजागिरी पौर्णिमेची संधी साधून घराच्या वरच्या मजल्यावर पार्टी ठेवली. या पार्टीला सायंकाळी ७ वाजता सुरुवात झाली. सुरुवातील शांत असणारे विद्यार्थ्यांनी येथेच मद्यप्राशन केले व रात्री ११ वाजता दरम्याने डीजेचा आवाज वाढवून नाचायला लागले. ते येवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी अंगावरचे कपडे काढले. असे येथील प्रथमदर्शिनी नागरिकांचे म्हणणे आहे. आजूबाजूला शिक्षण घेत असलेल्या तरुण मुलीही राहतात. त्यांनाही अश्लील इशारे करण्यापर्यंत या विद्यार्थ्यांचा प्रताप झाला. हा गोंधळ रात्री १२.३० वाजेपर्यंत सुरु होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांना हा त्रास सहन झाला नाही. त्यांनी घरमालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे परिसरातील शेकडो, महिला, तरुणी, व युवकांनी घराला घेराव घातला. परंतु याची चुणचुणी मद्यपि विद्यार्थ्यांना लागल्यामुळे संतापलेल्या नागरिकांच्या हस्ते बाजीरावचा प्रसाद बसण्याच्या भीतीने अनेक विद्यार्थी रात्रीच पळून गेले. दोघे सकाळी ४ वाजेपर्यंत घरातच लपून बसले होते. यासंदर्भाची माहिती नागरिकांनी रात्रीच गाडगेनगर पोलिसांना दिली. रविवारी यासंदर्भाची तक्रारही करण्यात येणार आहे. त्यामुळे रात्री १.३० वाजेपर्यंत नागरिकांना जागी राहावे लागले. या प्रकरणामुळे गाडगेनगरातील वातावरण गरम झाले होते.