विद्यार्थ्यांचा चक्काजाम
By Admin | Updated: October 16, 2016 00:15 IST2016-10-16T00:15:20+5:302016-10-16T00:15:20+5:30
दर्यापूर-भामोद ही बस चार तास होऊनही बसस्थानकात न लागल्याने शेकडो विद्यार्थ्यांनी मुख्य मार्गावर चक्काजाम आंदोलन केले.

विद्यार्थ्यांचा चक्काजाम
दर्यापूर आगारातील घटना : चार तासांपासून विद्यार्थी तिष्ठत
दर्यापूर : दर्यापूर-भामोद ही बस चार तास होऊनही बसस्थानकात न लागल्याने शेकडो विद्यार्थ्यांनी मुख्य मार्गावर चक्काजाम आंदोलन केले.
आगारासमोर शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता करण्यात आले. या आंदोलनामुळे १५ मिनिट वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी आगार व्यवस्थापकाच्या व शासनाच्या निषेधाच्या घोषणाही करण्यात आल्यात. त्यामुळे आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांना ताब्यात कसे घ्यावे हा पेच वाहतूक पोलिसांना पडला.
दर्यापूर आगारात अनेक दिवसांपासून गलथान कारभार सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागात वेळेवर बससेवा मिळत नाही. दुपारी अडीच वाजताची बस ६.३० वाजेपर्यंतही न लागल्यामुळे विद्यार्थ्यांचा संयम तुटला. त्यांनी अधिकाऱ्यांना यासंदर्भात विचारणा केली असता. त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. अखेर आपल्याला न्याय मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी चक्क चक्काजाम करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये विद्यार्थिनींचाही सहभाग मोठ्या प्रमाणात होता. यावेळी भूषण वानखडे, आकाश पळसपगार, प्रदीप भांडे, दीपक वानखडे, सीमा जामनिक, छाया ढोके, चेतन पवार, सोहीम सरदार यांनी सहभाग घेतला. वृत्त लिहिस्तोवर आंदोलन मागे घेण्यात आलेले नव्हते. (तालुका प्रतिनिधी)