विद्यार्थ्यांची हजेरी अॅपवर
By Admin | Updated: January 7, 2017 00:18 IST2017-01-07T00:18:03+5:302017-01-07T00:18:03+5:30
शाळांमध्य विविध उपक्रमांचा धडाका लावणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाने आता पटसंख्येवर नजर रोखली आहे.

विद्यार्थ्यांची हजेरी अॅपवर
जिल्हा परिषद सज्ज : लवकरच होणार अंमलबजावणी
अमरावती : शाळांमध्य विविध उपक्रमांचा धडाका लावणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाने आता पटसंख्येवर नजर रोखली आहे. विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती यापुढे मोबाईल अॅपवर नोंदविण्यात येणार आहे. याबाबत प्राथमिक शिक्षण विभागाने यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच हा प्रस्ताव सीईओंकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे.
स्थलांतरित आणि अन्य कारणांमुळे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या टिकविणे जिकरीचे झाले आहे. यावर प्रशासनाने मोबाईल 'अॅप'चा उतारा शोधला आहे. वास्तविक अनेक जिल्ह्यांमध्ये हा प्रयोग यापूर्वीही झाला आहे. आता शिक्षण विभागाने एलआयसीच्या माध्यमातून डेली अटेडन्स हा अधिकृत अॅप तयार केला जात आहे. येत्या दोन आठवड्यात याची अंमलबजावणी जिल्ह्यातील शाळांमध्ये केला जाणार आहे. येत्या दोन आठवड्यात याची अंमलबजावणी जिल्हाभरातील शाळांमध्ये केली जाणार आहे. या अॅपवर विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती नोंदविण्याचे शासनाचे नियोजन आहे. शिक्षण विभागामार्फत जिल्हा परिषद शिक्षकांना पुरेसा वेळ देऊन दोन आठवड्यात याची अंमलबजावणी सुरू करेल, असे संकेत आहेत. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अद्यापही इंटरनेटची रेंज पोहोचली नाही. चालू शैक्षणिक सत्रापासूृन शासनाने सक्तीचा केलेला पोषण आहाराचा एमडीएम अॅपही अनेक शिक्षक दररोज 'अपडेट' करू शकलेले नाहीत. त्यातच आता दैनंदिन हजेरी मोबाईल अॅपवर नोंदविताना अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. प्रत्यके वर्ग शिक्षकाला या अॅपमध्ये आपला मोबाईल नंबर अधिकृ तपणे रजिस्टर्ड करूनच आपापल्या वर्गाची हजेरी नोंदवावी लागणार आहे. परंतु एखाद्या शाळेच्या ठिकाणी दिवसभर रेंज नसल्यास हजेरी कशी आणि केव्हा नोंदवावी याबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम आहे.(प्रतिनिधी)