विद्यार्थ्यांची प्रवेश दिंडी

By Admin | Updated: June 28, 2016 00:10 IST2016-06-28T00:10:26+5:302016-06-28T00:10:26+5:30

जिल्हाभरातील २० प्रकल्पांतील अडीच हजार अंगणवाडी केंद्रांतून सोमवारी शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेश दिंडी काढण्यात आली.

Students' admission bill | विद्यार्थ्यांची प्रवेश दिंडी

विद्यार्थ्यांची प्रवेश दिंडी

पहिल्यांदा उपक्रम : १५ हजारांवर विद्यार्थी पहिल्या वर्गात दाखल
नरेंद्र जावरे परतवाडा
जिल्हाभरातील २० प्रकल्पांतील अडीच हजार अंगणवाडी केंद्रांतून सोमवारी शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेश दिंडी काढण्यात आली. पंधरा हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत विविध केंद्रांतून शाळेपर्यंत उत्साही वातावारण पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, पालकांनी पोहोचवून दिलेत.
अंगणवाडी केंद्रामध्ये ३ ते ६ वयोगटातील चिमुकल्यांना बडबड गीते, अक्षर ओळख, खेलणे व पोषण आहार दिला जातो. सहा वर्षांनंतर पहिल्या वर्गात प्रवेश घेणारा विद्यार्थी अंगनवाडी केंद्रातूनच बाहेर पडतो. सतत तीन वर्षे या चिमुकल्यांवर संस्कार टाकणारी अंगणवाडी सेविका आई नंतर प्रथम शिक्षिका असते. तर प्राथमिक शाळेच्या मूलभूत पाया विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी शालेय जीवनात प्रवेश करताना तो अविस्मरणीय रहावा यासाठी जिल्ह्यात पहिल्यांदा जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी कैलास घोडके यांच्या कल्पकतेतून प्रदेश दिंडी सोमवारी आनंदात काढली गेली.

मेळघाटात बैलगाडीतून दिंडी
जिल्हाभर सोमवारी प्रवेश दिंडी विविध कल्पकतेतून काढण्यात आली. चिखलदरा तालुक्याच्या बिहाली येथे चक्क बैलगाडी सजवून चिमुकल्यांना बसवून शाळेपर्यंत सोडण्यात आले. कुठे तर विविध थोर पुरुषांचे वेश परिधान करून गावातून प्रभातफेरी काढून शाळेत सोडण्यात आले. चॉकलेटसह पुष्पगुच्छ देऊन पहिल्या दिवशी नवगत विद्यार्थ्यांचे स्वागतसुद्धा करण्यात आले.

शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न
जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रातून शाळेपर्यंत निघालेल्या प्रवेश दिंडीच्या रुपाने जवळपास पंधरा हजार नवीन विद्यार्थ्यांनी पहिल्या वर्गात प्रवेश मिळविला. विद्यार्थ्यांना शालेय जीवनात आणून शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचा एक चांगला प्रयोग यातून करण्यात आला.

जिल्हाभरात प्रवेश दिंडीच्या माध्यमातून जवळपास १५ हजारांवर नवीन विद्यार्थ्यांनी पहिल्या वर्गात प्रवेश घेतला. अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मदतनीस व गावकऱ्यांनी मोठी भूमिका यात बजावली. यातून पुढील वर्षी पहिल्या वर्गात प्रवेश पात्र विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारेल.
- कैलास घोडके, उपमुख्य कार्यपालन अधिकारी,
महिला व बालकल्याण विभाग

Web Title: Students' admission bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.