११चे विद्यार्थी आता अंतिम यादीच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: July 14, 2014 23:43 IST2014-07-14T23:43:00+5:302014-07-14T23:43:00+5:30
इयत्ता ११च्या केंद्रीय प्रवेश अर्ज विक्री व स्वीकृती प्रक्रियेला पूर्णविराम मिळाला आहे. आता १९ जुलै रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम यादीची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना लागली आहे. यावर्षात ९ हजार ३५५

११चे विद्यार्थी आता अंतिम यादीच्या प्रतीक्षेत
अमरावती : इयत्ता ११च्या केंद्रीय प्रवेश अर्ज विक्री व स्वीकृती प्रक्रियेला पूर्णविराम मिळाला आहे. आता १९ जुलै रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम यादीची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना लागली आहे. यावर्षात ९ हजार ३५५ विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असून विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल विज्ञान शाखेकडे असल्याचे चित्र आहे.
यावर्षी इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने सुरु झाली. कॅम्पस कोटा व मायनॉरिटी कोटा प्रवेशाकरिता शाळा व कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २७ ते ३० जूनपर्यंत अर्ज विक्री व स्वीकृत प्रक्रिया राबविण्यात आली. १ जुलै रोजी पहिली यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी २८ जून ते ४ जुलैपर्यंत प्रवेश अर्ज विक्री करण्यात आले. सुमारे ८ हजार अर्जांची विक्री झाली. त्यानंतर विलंब शुल्कासह अर्ज विक्री व अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया ३० जून ते ४ जुलैपर्यंत राबविण्यात आली. १२ जुलै रोजी विशेष राखीव संवर्गातील ३०७ विद्यार्थ्यांची यादी जाहीर होताच शहरातील विविध महाविद्यालयांत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. या प्रवेशासंबंधित तक्रार करण्याकरिता १४ जुलै ही तारीख विद्यार्थ्यांना देण्यात आल्यावर केंद्रीय समितीकडे एक तक्रार प्राप्त झाली होती. यामध्ये त्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रातील त्रृटी दुरुस्त करुन प्रवेश देण्यात आला. अकरावीत प्रवेश घेणाऱ्या सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी शेवटची तारीख १९ जुलै असून अर्जात नमूद महाविद्यालयाच्या यादीप्रमाणे विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होईल.