विद्यार्थ्याचे वर्ग आणि शाळेचे व्यवस्थापन एकाच खोलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:18 IST2021-02-26T04:18:25+5:302021-02-26T04:18:25+5:30

जिल्हा परिषदेच्या २५ शाळेतील चित्र, ज्ञानादानासह कार्यालयीन काम एकत्रच अमरावती: जिल्हा परिषदेच्या १ हजार ५८३ शाळा आहे. यापैकी एक ...

Student class and school management in the same room | विद्यार्थ्याचे वर्ग आणि शाळेचे व्यवस्थापन एकाच खोलीत

विद्यार्थ्याचे वर्ग आणि शाळेचे व्यवस्थापन एकाच खोलीत

जिल्हा परिषदेच्या २५ शाळेतील चित्र, ज्ञानादानासह कार्यालयीन काम एकत्रच

अमरावती: जिल्हा परिषदेच्या १ हजार ५८३ शाळा आहे. यापैकी एक व दोन शिक्षकी शाळा असलेल्या २५ ठिकाणच्या शाळांमध्ये विद्यार्थ्याचे वर्ग आणि शाळेचे कार्यालयीन कामकाज एकाच खोलीत केले जात असल्याने गैरसोयीचा सामना करावा करावा लागत आहे.

खासगी शाळांच्या तुलनेत सरकारी शाळांमध्ये फारशा भौतिक सुविधा उपलब्ध नसतात, अशी ओरड नेहमी होते. जिल्हा परिषद शाळांमध्येही बऱ्यापैकी भौतिक सुविधा उपलब्ध केल्या जात आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या २४ शाळांमध्ये मुख्याध्यापक आणि स्टाफ रूम नसल्याने एकाच खोलीतून विद्यार्थ्यांच्या ज्ञानादानासोबतच शाळेचे कार्यालयीन कामकाज करावे लागत आहे. खासगी शाळेत मुख्याध्यापकांना कार्यालयीन कामकाजासाठी स्वतंत्र कक्ष असतो; मात्र झेडपीच्या जिल्ह्यातील एक व दोन शिक्षकी शाळांमध्ये अशा प्रकारची सुविधा नसल्याने शिक्षणासोबतच शैक्षणिक कामकाज एकाच ठिकाणाहून करावे लागत असल्याने एका शिक्षकांने वर्गाचा तास घेतल्यानंतर दुसऱ्या शिक्षकांना व्हरांड्यात बसून आपले शैक्षणिक कामकाज करावे लागते. त्यामुळे ज्या शाळांमध्ये मुख्याध्यापक व स्टाफ रूम असणे आता अत्यंत आवश्यक बाब झाली आहे.

बॉक्स

शाळांमध्ये अडचणींचा डोंगर

जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये विविध अडचणी आहेत. अनेक शाळांमधील वर्ग खोल्यांची उणीव आहे. ग्रामीण भागात नेटवर्क राहत नसल्याने संगणकीय शैक्षणिक साहित्याद्वारे शिकवणी करण्यास अडचण जात आहे. फर्निचर नसल्याने दस्ताऐवज शाळेचे विविध साहित्य फाईल्स एका वर्ग खोलीच्या काेपऱ्यात ठेवावे लागत आहे.

बॉक्स

शिक्षकांसमोर पेच

बहुतांश शाळांना स्वतंत्र वर्ग खोल्या नसल्याने शिक्षकांनाही आपली कामे वर्गात बसून करावी लागत आहे. काही वेळा शाळांमध्ये खोली नसल्याने एक शिक्षक वर्गात शिकवित असतात. तर दुसरे वर्गाच्या बाहेर व्हरांड्यात बसून शाळेतील इतर कामे करतात.

कोट

झेडपीच्या बहुतांश शाळांमध्ये मुख्याध्यापकांना कार्यालयीन कामकाज करता यावे याकरिता स्वतंत्र कक्ष आहेत. केवळ एक व दोन शिक्षकी शाळांमध्ये अशी व्यवस्था नाही. परंतु अशा शाळांमध्ये मुख्याध्यापक कक्ष व स्टाफ रूमकरिता तरतूद उपलब्ध झाल्यास स्वतंत्र खोली बांधून देण्याचा प्रयत्न केला जाईल.

ई. झेड. खान

शिक्षणाधिकारी प्राथमिक

बॉक्स

जिल्ह्यातील एकूण शाळा-१,५८३

मुख्याध्यापक कक्ष नसलेल्या शाळा -२५

स्टाप रूम नसलेल्या शाळा २५

या शाळेतील विद्यार्थ्यी संख्या ३८०

Web Title: Student class and school management in the same room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.