लोकमत न्यूज नेटवर्कलेहेगाव/तिवसा : मोर्शी तालुक्यातील शिरखेडनजीक काशी व देवगिरी नदीच्या पुरात अडकलेल्या एसटी बसमधील १९ प्रवाशांना जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाच्या पथकाने सुखरूप बाहेर काढले. गुरुवारी रात्री ९ ते ११ असे दोन तास प्रवाशांनी हा थरार अनुभवला. शिरखेड पोलीस ठाण्यात प्रवाशांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.१९ प्रवाशांना घेऊन निघालेली मोर्शी आगाराची एमएच ४० - ८०४१ क्रमांकाची एसटी लाडकीलगतच्या पुलावर पाण्यात अडकल्याची माहिती मुकुंद देशमुख यांनी स्थानिक पोलिसांसह जिल्हा प्रशासनास दिली. त्याआधारे जिल्हाधिकारी कार्यालयातून शोध व बचाव पथकाचे १७ सदस्य रात्री १० वाजता दाखल झाले. दोन्ही नदीचे पाणी कमी होत नसल्याचे पाहून काशी नदीवरील कच्च्या पुलाला फोडून पाणी जाण्यासाठी मार्ग करण्यात आला. तथापि, १९ प्रवाशांना रात्री ११ वाजता सुखरूप बाहेर काढण्यात आले.बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांमध्ये राणी मेश्राम (रा. मंगरूळ भिलापूर), सायली गायकी (रा. लाडकी), आरती चांदणे (रा. भिलापूर), पूजा निखार (रा. शिरजगाव), सुनीता भुयार (रा. शिरजगाव), प्रतिज्ञा गायकी (रा. लाडकी), इंदिरा वेडेकर (रा.अडगाव), सुनंदा वानखडे (रा. लोणी), बाबुराव ठाकरे (रा. अडगाव), हिम्मत केवस्कर (रा. शिरजगाव), राजकुमार ढवळे (रा. शिरजगाव), मंगेश राणे (रा. शिरजगाव), सारिका तिजारे (रा. नेरपिंगळाई), चंद्रभान ठाकरे (रा. निंभी), मुकुंद निस्ताने (रा. शिरजगाव), गोपाल शहाणे (रा. रोहणखेड), सुरेश पचारे (चालक, रा. मोर्शी) यांचा समावेश होता. सर्व प्रवाशांना पुरातून बाहेर काढण्याकरिता आपत्ती कक्षाचे सुरेश रामेकर यांच्या मार्गदर्शनात गणेश बोरकर, गुलाब पाटणकर, विजय धुर्वे, हिरालाल पटेल, प्रवीण आखरे, कैलास ठाकरे, देवानंद भुजाडे, हेमंत सरकटे, संदीप देवकते, उदय मोरे, महेश मांदाळे, प्रफुल्ल भुसारी, अजय आसोले, कौस्तुभ वैद्य, अमोल हिवराळे, राजेंद्र शहाकार, दीपक डोरस, वसीम पठाण, शिरखेडचे ठाणेदार केशव ठाकरे, देशमुख,नीलेश देशमुख, मनोज टप्पे, शानू चुगडा, पीआय किरण लाकडे, महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी, मोर्शीचे नायब तहसीलदार किशोर गावंडे, जिल्हा परिषद सदस्य शरद मोहोड, भाजपच्या निवेदिता दिघडे, मोर्शी आगार व्यवस्थापक सुनील भाळतीलक हे घटनास्थळी प्रवाशांच्या मदतीकरीता हजर होते.
पुरात अडकली एसटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 06:00 IST
१९ प्रवाशांना घेऊन निघालेली मोर्शी आगाराची एमएच ४० - ८०४१ क्रमांकाची एसटी लाडकीलगतच्या पुलावर पाण्यात अडकल्याची माहिती मुकुंद देशमुख यांनी स्थानिक पोलिसांसह जिल्हा प्रशासनास दिली. त्याआधारे जिल्हाधिकारी कार्यालयातून शोध व बचाव पथकाचे १७ सदस्य रात्री १० वाजता दाखल झाले.
पुरात अडकली एसटी
ठळक मुद्देरेस्क्यू : शिरखेडनजीकची घटना, १९ प्रवाशांची सुखरुप सुटका