एसटीचा ‘जीपीएस डिव्हाईस’ कागदावरच

By Admin | Updated: March 15, 2015 00:42 IST2015-03-15T00:42:54+5:302015-03-15T00:42:54+5:30

राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये जीपीएस डिव्हाईस बसवण्यासंदर्भात २०११-२०१६ च्या कामगार करारातील समझोत्यात निर्णय घेण्यात आला होता.

STT's 'GPS Devices' paper | एसटीचा ‘जीपीएस डिव्हाईस’ कागदावरच

एसटीचा ‘जीपीएस डिव्हाईस’ कागदावरच

अमरावती : राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये जीपीएस डिव्हाईस बसवण्यासंदर्भात २०११-२०१६ च्या कामगार करारातील समझोत्यात निर्णय घेण्यात आला होता. दोन महिन्यांत कार्यवाही करा, असा आदेशही शासनाने दिलेला होता. मात्र जिल्ह्यात अद्यापही एकाही ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित झाली नाही.
जिल्ह्यात एका राज्य परिवहन विभागाच्या एसटी आगारातील एकाही बसला ही यंत्रणा बसवलेली नाही. त्यामुळे महामंडळाचा जीपीएस डिव्हाइस अद्यापही कागदावरच आहे.
शासनाच्या योजना राबविण्याच्या घोषणा होतात. मात्र त्यातील अनेक योजना लालफितीत अडकल्याने रखडतात किंवा बंद होतात. त्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधील जीपीएस डिव्हाइस व्यवस्था आहे ही यंत्रणा राबविण्यासाठी अनेक वेळा पत्र काढण्यात आले. २६ नोव्हेंबर २०१४ रोजी असेच पत्र काढण्यात आले होते. मात्र अजूनही त्यावर कार्यवाही झालेली नाही. जिल्ह्यात अद्याप ही यंत्रणा कोठेही कार्यान्वित केलेली नाही. परंतु ती लवकरच सुरू केली जाईल. (प्रतिनिधी)

Web Title: STT's 'GPS Devices' paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.