शहरं
Join us  
Trending Stories
1
"पक्षासाठी केसेस अंगावर, तिकीट मात्र दुसऱ्यांना"; संभाजीनगरात भाजप पदाधिकाऱ्यांचा राडा
2
काहीतरी मोठं घडणार! चीनची आक्रमक हालचाल, तैवानला सैन्याने वेढा घातला; विमानांची उड्डाणेही रद्द
3
Municipal Election 2026: सुरुवात झाली! अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेची युती तुटली...
4
फोटोग्राफर, प्रोड्यूसर, नॅशनल लेव्हल फुटबॉलपटू... कोण आहे प्रियंका गांधींची होणारी सून?
5
विरोधकांच्या एकीला तडे; वसई-विरारमध्ये उद्धवसेना स्वबळावर, महायुतीतील मित्रपक्षाचा पाठिंबा
6
बच्चू कडूंच्या प्रहारची उद्धवसेनेसोबत युती, पण उमेदवार लढणार मशाल चिन्हावर!
7
Travel : चला, प्रेमाच्या शहरात! आयफेल टॉवर अन् सीन नदीच्या काठावर फिरण्यासाठी असा करा परफेक्ट प्लॅन
8
मिशन बंगाल; अमित शाहांनी रणनीती आखली, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जींचा सामना करणार...
9
मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेसकडून ५६ उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध, अमराठी आणि मुस्लिम चेहऱ्यांना दिलं प्राधान्य   
10
२०२५ सरता सरता...! Google वर '67' सर्च करताच तुमची स्क्रीन थरथरू लागतेय? तुम्हीही करून पहा...
11
बाजारात एन्ट्री घेताच जोरदार आपटला 'हा' शेअर, पहिल्याच दिवशी २४% नं घसरला, गुंतवणूकदारांना मोठा झटका
12
"सूर्यकुमार यादव मला खूप मेसेज करायचा, पण आता...", बोल्ड कंटेटमुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्रीचा खळबळजनक दावा
13
महायुतीत फूट! धुळ्यातही भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेना-अजित पवारांची NCP युतीत लढणार
14
Silver Price : चांदीचा ‘सिल्वर रिटर्न’! ऑक्टोबरची गुंतवणूक, डिसेंबरमध्ये ७२ हजारांचा फायदा; गणित समजून घ्या
15
'घरातील लोकांना तिकीट हवं होतं म्हणून युती तोडली!'; भाजपचा शिंदेसेनेवर पलटवार
16
"हा तर विश्वासघातच"; मित्रपक्षांनी 'झुलवत' ठेवल्याने रिपाई आक्रमक, रामदास आठवलेंनी दिला अल्टिमेटम
17
भाजपाचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी जुळले; शिंदेसेनेशी मात्र बिघडले! कोण किती जागा लढवणार?
18
LPG सबसिडीचे सूत्र बदलणार! अमेरिकेकडून गॅस आयातीमुळे केंद्र सरकार नवा निर्णय घेण्याच्या तयारीत
19
“कोणीही-कितीही सोडून जाऊ द्या, वसई-विरारमध्ये विजय आमचाच होणार”; हितेंद्र ठाकूरांचा एल्गार
20
प्रियंका गांधींच्या मुलाने गुपचुप उरकला साखरपुडा; 'ही' सुंदरी होणार वाड्रा कुटुंबाची सून...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अवकाळी पावसाची दमदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 09:50 IST

जिल्ह्यात मंगळवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये चांदूर बाजार तालुक्यात एका युवकाचा मृत्यू झाला. संत्री, केळी, आंबा तसेच भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. अवकाळी पावसासोबत विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारादेखील होता.

ठळक मुद्देउकाड्यापासून मिळाला दिलासा : बागायती पिकांचे नुकसान, सोसाट्याच्या वाऱ्याने वीजपुरवठा खंडित

अमरावती : जिल्ह्यात मंगळवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये चांदूर बाजार तालुक्यात एका युवकाचा मृत्यू झाला. संत्री, केळी, आंबा तसेच भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.अवकाळी पावसासोबत विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारादेखील होता. अनेक ठिकाणी झाडे वीजतारांवर पडून विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे काही तालुक्यांमध्ये नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. चिखलदरा तालुक्यात अद्याप वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही.अंजनगाव सुर्जीत केळीला नुकसानअंजनगाव सुर्जी तालुक्यात रात्री ११ पासून सोसाट्याचा वाºयासह पावसाने हजेरी लावली. पावसामुळे जीवितहानी झालेली नसली तरी बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. केळीची रोपे मुळापासून उखडली तसेच बोराएवढी झालेली संत्री व आंब्याचा खच झाडांखाली लागला.शेंदूरजना बाजार येथे भिंत पडलीतिवसा तालुक्यात मंगळवारी दुपारी २ व रात्री १२ च्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. शेंदूरजना बाजार येथे घराची भिंत कोसळून निर्मला वाघमारे या किरकोळ जखमी झाल्या. टीव्ही व दोन मोबाइल फुटले. शिरजगाव मोझरी येथे रामेश्वर टोने यांनी शेतात लावलेला कांद्याचा ढीग पावसाच्या तडाख्यात सापडल्याने ७० हजारांचे नुकसान झाले.मरणासन्न संत्र्याला मिळाले जीवदानवरूड तालुक्यात अवकाळी पावसामुळे संत्र्याच्या अंबिया बहराची गळती झाली तरी मरणासन्न अवस्थेला पोहोचलेल्या संत्र्याला जीवदान मिळाले, हे विशेष. वादळी वाºयाने शेंदूरजनाघाट, वरूड, बेनोडा, पुसला या परिसरात छपरे उडाली. शेंदूरजनाघाट येथे दिनेश कुºहाडे यांची चहाटपरी वादळाने उडाली. शेंदूरजनाघाट, वाठोडा, राजुराबाजार, पुसला रस्त्यावर झाडे कोसळल्याने रात्रभर विद्युत पुरवठा खंडित झाला होता.जुळ्या शहरांत पावसाची हजेरीपरतवाडा-अचलपूर शहरासह ग्रामीण भागात मंगळवारी रात्री ९.४० पासून जोरदार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची दैना उडाली. दोन दिवसांपासूनच ढगाळ वातावरण होते. अचलपुरात रात्री २ नंतर वीजपुरवठा सुरळीत झाला.चिखलदरा अंधारातविदर्भाचे नंदनवन चिखलदरा येथेसुद्धा मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. तालुक्याच्या ग्रामीण भागात विजांसह सोसाट्याच्या वाऱ्याने थैमान घातले. त्यामुळे वीज तारा तुटल्या. येथील खंडित वीजपुरवठा बुधवारीदेखील बहाल झाला नाही.चांदूर रेल्वेत मेघगर्जनेसह पाऊसचांदूर रेल्वे तालुक्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारपासून थोड्या-थोड्या वेळाने पावसाची रिपरिप सुरू झाली होती. रात्री ९ वाजता सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. मध्यरात्रीनंतर पाऊस थांबला.मोर्शीत पावसाचा करंटेपणा कायममोर्शी तालुक्यात मंगळवारीदेखील पावसाने अल्प हजेरी लावून करंटेपणा कायम ठेवला. पावसाळ्यात न बरसलेल्या पावसाने तालुक्यात पाणीटंचाई निर्माण केली आहे. आतादेखील तुरळक पाऊसच झाल्याने तालुकावासीयांच्या अंगाला घामाच्या धारा लागल्या होत्या.नांदगावात ५ मिमी पाऊसनांदगाव खंडेश्वर तालुक्यात ११ एप्रिलला मतदानादरम्यान अवकाळी पाऊस कोसळला. त्यानंतर मंगळवारी पुन्हा पावसाने हजेरी लावली. मात्र, अवघी ५ मिमी एवढी नोंद झाली आहे.धारणीत वादळी वाºयासह पाऊसधारणी तालुक्यात मंगळवारी दुपारी व सायंकाळी अचानक वादळी वाºयासह अवकाळी पावासाने हजेरी लावली. दहेंडा, टिंगऱ्या, काल्पीसह परिसरातील आणखी काही आदिवासी खेड्यांत घरावरील टिनाचे छप्पर उडाले व कुडाच्या घरांचे नुकसान झाले. उन्हाळी मुगाचे नुकसान झाले आहे.दर्यापुरात बुधवारीदेखील पाऊसदर्यापूर तालुक्यात मंगळवारी रात्री १२ नंतर पाऊस कोसळला तसेच बुधवारी भल्या पहाटे विजेच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले. दर्यापूर-अमरावती मार्गावर काही ठिकाणी रस्त्यावर काट्या पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता मोकळा केला. ठिकठिकाणी पाणी साचले होते.धामणगाव तालुक्याला वादळी पावसाचा तडाखाधामणगाव रेल्वे तालुक्याला मंगळवारी वादळी पावसाने तडाखा दिला. उसळगव्हाण येथील नितीन दगडकर यांच्या गावरान आंबा बागेचे मोठे नुकसान झाले. महिमापूर, वरूड बगाजी या भागात बहरलेल्या आंब्याला फटका बसला. जुना धामणगाव, जळगाव, देवगाव, मलातपूर, बोरवघड परिसरात घरावरील छपरे वादळी वाºयाने उडाली. विजेचा कडकडाट व वादळी पावसामुळे वीजपुरवठा काही तास खंडित झाला होता.बेलोरा शिवारात वीज कोसळून युवकाचा मृत्यूचांदूर बाजार तालुक्यातील बेलोरा शिवारातील शेतात काम करणाºया महादेव ऊर्फ मधू गोविंद गायने या युवकाचा मंगळवारी वीज कोसळून मृत्यू झाला. मंगळवारी रात्री तालुक्यात अचानक विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. बºहाणपूर येथील ओंकार शेकार यांच्या बेलोरा शिवारातील शेतात काम करणाऱ्या महादेव गायने (३५, रा. खामला, मध्य प्रदेश) याच्या अंगावर वीज कोसळली. गंभीर भाजला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मोलमजुरी करणाऱ्या महादेवच्या पश्चात पत्नी तुळशी गायने, मुलगा मनोज व मुलगी शारदा असा परिवार आहे. महसूल अधिकारी निवडणूक कामात व्यस्त असल्याने अवकाळी पावसामुळे तालुक्यात किती नुकसान झाले, याबाबत निश्चित आकडा पुढे आलेला नाही तसेच वृत्त लिहिस्तोवर गायने कुटुंबाची अधिकाºयांनी भेट घेतली नसल्याची माहिती पुढे आली आहे.

टॅग्स :Rainपाऊस