जिल्ह्यात दमदार पाऊ स

By Admin | Updated: July 25, 2015 00:12 IST2015-07-25T00:12:36+5:302015-07-25T00:12:36+5:30

जिल्ह्यात गुरुवार ते शुक्रवार या २४ तासांत ४०.२ मि.मी. पाऊस पडला.

Strong force in the district | जिल्ह्यात दमदार पाऊ स

जिल्ह्यात दमदार पाऊ स

धारणी अतिवृष्टी : सरासरीत मात्र गतवर्षीच्या तुलनेत कमी
अमरावती : जिल्ह्यात गुरुवार ते शुक्रवार या २४ तासांत ४०.२ मि.मी. पाऊस पडला. यामध्ये धारणी तालुक्यात अतिवृष्टी झाली. त्यापूर्वीच्या २४ तासांत ११.५ मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात १९ जुलैपासून कमी-अधिक प्रमाणात सर्वत्रच पाऊस होत असला तरी गतवर्षीच्या सरासरीच्या तुलनेत सद्यस्थितीत पाऊस मात्र कमी आहे.
जिल्ह्यात १ जून ते २४ जुलै या कालावधीत पावसाची सरासरी ३६० मि.मी. अपेक्षित असताना २९४ मि.मी. पाऊ स पडला. याच तारखेला २०१४ मध्ये ३७९ मि.मी. पावसाची नोंद होती. त्या तुलनेत यंदा थोडा कमी पाऊस पडला आहे. गुरुवार ते शुक्रवार सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ४०.२ मि.मी. पाऊस पडला. त्यामध्ये सर्वाधिक ६७.५ मि.मी. पाऊस धारणी तालुक्यात पडला आहे. तिवसा ६३.४ , अचलपूर ६०, अंजनगाव सुर्जी ६१, अमरावती ३९.९, भातकुली २५.६, नांदगाव खंडेश्वर २०, चांदूररेल्वे २६.६, धामणगाव १९.३, मोर्शी ३५.९, वरुड ३४, अचलपूर ३६.१, दर्यापूर १८ व चिखलदरा तालुक्यात ५५.७ मि.मी. पाऊ स पडला आहे.
जिल्ह्यात १ जून ते २४ जुलै दरम्यान २९४.१ मि.मी. पाऊ स पडला आहे. यामध्ये सर्वाधिक ४६४.४ मि.मी. पाऊ स चिखलदरा तालुक्यात आहे. धारणी ३९३.२, तिवसा ३६६.४, नांदगाव ३४८.९, अमरावती ३२१.९, भातकुली २४३.९, चांदूररेल्वे २२१.९, धामणगाव रेल्वे १८२.१, मोर्शी २७२, वरुड २९१.२, अचलपूर २६६.८, चांदूरबाजार २२५.९, दर्यापूर २०१.१, अंजनगाव २८४.५ मि.मी. पाऊस पडला आहे.
मुसळधार पावसामुळे धारणी येथील शाळेचे कंम्पाउंड पडले, तिवसा तालुक्यात सूर्यगंगा नदीला पूर आल्यामुळे तळेगाव ठाकूर येथील नदीकाठच्या गोठ्यात पाणी घुसून ३ म्हशी व २ गाई मृत्यूमुखी पडल्या आहेत. गुरुवारला वलगाव येथील जगदीश गावनेर यांच्या शेतात धुऱ्यावर गुंफाबाई निवृत्ती जाधव (६०) ही महिला विजेच्या धक्क्याने मृत झाल्यावर दीपा संतोष धोटे (३०) दोन्ही राहणार अकोला ही महिला जखमी झाल्याची घटना घडली.
२४ तासात अतिवृष्टीची शक्यता
विदर्भातील काही भागात शुक्रवार सकाळी ८.३० ते शनिवार सकाळी ८.३० पर्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता नागपूर विमानतळाच्या हवामान विभागाने कळविले आहे. तसेच जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Strong force in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.