आडकाठी : शेती विकासाला चालना देण्यासाठी भरीव निधीची गरज
By Admin | Updated: February 18, 2015 00:08 IST2015-02-18T00:08:07+5:302015-02-18T00:08:07+5:30
कोरडवाहू शेती अभियानासाठी राज्य शासनाने चालू वर्षात अर्थसंकल्पात दीडशे कोटी रुपयांची तरतूद केली.

आडकाठी : शेती विकासाला चालना देण्यासाठी भरीव निधीची गरज
अमरावती : कोरडवाहू शेती अभियानासाठी राज्य शासनाने चालू वर्षात अर्थसंकल्पात दीडशे कोटी रुपयांची तरतूद केली. त्यापैकी ९० कोटी रुपयांच्या कार्यक्रमाला यापूर्वीच तर आता नव्याने २२ कोटी ५० लाख रुपयांच्या कार्यक्रमाला वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. राज्याच्या कृषी विभागाने याबाबतचा नुकताच आदेश जारी केला. मात्र अमरावतीसह राज्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी महत्वांकांक्षी ठरणाऱ्या या अभियानाला अंमलबजावणी निधी पुरेसा मिळाला नसल्याने फटका बसण्याची शक्यता आहे.
मागील आघाडी सरकारने सन २०१४-१५ ते २०१८-२०१९ या पाच वर्षात राज्यात कोरडवाहू शेती अभियान राबविण्याची घोषणा केली होती. याअंतर्गत तब्बल वीस हजार कोटी रुपयांचा जमीन विकास कार्यक्रम राबविण्याचे नियोजन आहे. त्यापैकी दोन हजार कोटी रुपये कोरडवाहू शेती अभियान राबविण्यासाठी स्वतंत्र्यरित्या उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली. चालू आर्थिक वर्षात राज्यभरातील कोरडवाहू शेतीच्या स्थैर्याची तरतूद करणे, या बाबीसाठी शासनाने १५० कोटी रुपये मंजूर केले असून यापैकी ९० कोटी रुपयांच्या वाटपाला यापूर्वीच मंजुरी दिली आहे. आता नव्याने २२ कोटी ५० लाख रुपयांच्या वितरणाला मंजुरी देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)