शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

वीज, वादळासह अवकाळीने घात; चार व्यक्ती, २६ गुरे मृत, ७२०० हेक्टरला फटका

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 8, 2023 18:02 IST

विभागात २४ तासांत सरासरी ८.७ मिमी पाऊस

अमरावती : पश्चिम विदर्भात शुक्रवारी वीज, वादळांसह झालेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. या आपत्तीमध्ये चार व्यक्ती मृत झाले, याशिवाय २९ जनावरे मृत झाली, ७१५८ हेक्टरमधील रब्बी, भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाले. याशिवाय १५१ घरांची पडझड झाल्याचा विभागीय आयुक्तांचा प्राथमिक अहवाल आहे.

विभागात २४ तासांत सरासरी ८.७ मिमी पाऊस पडला. मार्च महिन्यापासून तिसऱ्यांदा वीज वादळासह झालेल्या अवकाळी पावसाने संकट ओढावले आहे. यावेळी अंगावर वीज कोसळून बुलढाणा जिल्ह्यात २, अमरावती व अकोला जिल्ह्यात प्रत्येकी १, अशा चार जणांचा मृत्यू झालेला आहे. याशिवाय आपत्तीमध्ये अकोला जिल्ह्यात १६, बुलढाणा ७, यवतमाळ ४ व अमरावती जिल्ह्यात २, अशा एकूण २९ जनावरांचा मृत्यू झालेला आहे.

वादळासह पावसाने अमरावती जिल्ह्यात ११२, अकोला ३५, बुलढाणा ३ व यवतमाळ जिल्ह्यात १ अशा एकूण १५१ घरांची पडझड झालेली आहे. यामध्ये पाच घरे पूर्णत: नष्ट झाली असल्याचा विभागीय आयुक्तांचा प्राथमिक अहवाल आहे. विभागात आणखी दोन दिवस काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

रब्बी, भाजीपाला, फळपिकांचे मोठे नुकसान

पश्चिम विदर्भात शुक्रवारच्या अवकाळी पावसाने गहू, कांदा, मिरची, लिंबू, संत्रा, आंबा, हरभरा, टरबूज, पपई, भाजीपाला, शेवगा, तूर, मका, ज्वारी, हळद व सूर्यफुलाचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक ५२४२ हेक्टरमध्ये अकोला जिल्ह्यात, ११२० हेक्टर बुलढाणा, ५२३ हेक्टर अमरावती, २५५ हेक्टर यवतमाळ व १८.४८ हेक्टरमध्ये वाशिम जिल्ह्यात नुकसान झाले आहे.

टॅग्स :weatherहवामानRainपाऊसAmravatiअमरावती