विद्यार्थिनीला त्रास देणाऱ्या सख्याहरीला अटक

By Admin | Updated: August 10, 2016 23:59 IST2016-08-10T23:59:01+5:302016-08-10T23:59:01+5:30

नागपूर जिल्ह्यातील १९ वर्षिय विद्यार्थिनी वरुडच्या एका महाविद्यालयात शिक्षणाकरीता एसटीने येत असताना...

Strikers arrested for harassing students | विद्यार्थिनीला त्रास देणाऱ्या सख्याहरीला अटक

विद्यार्थिनीला त्रास देणाऱ्या सख्याहरीला अटक

वरुड येथील घटना : पाठलाग करून छेडखानी
वरूड : नागपूर जिल्ह्यातील १९ वर्षिय विद्यार्थिनी वरुडच्या एका महाविद्यालयात शिक्षणाकरीता एसटीने येत असताना मोवाड येथील २७ वर्षिय सख्याहरीने तिचा पाठलाग करून सतत तिला त्रास दिला. मंगळवारी सुद्धा हा प्रकार घडल्याने फिर्यादी तरुणीने तिच्या काकाला बोलावून पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरुन पोलीसांनी सख्याहरीला बसस्थानकावरच पकडले. या युवकाविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून प्रकरण नरखेड पोलिसांकडे वळते करण्यात आले आहे.
विद्यार्थिनीला त्रास देणारा सख्याहरीचे नाव हर्षल घनश्याम सातपुते (२७ रा.मोवाड, ता.नरखेड,जि.नागपूर) असे आहे. हा युवक मागील अनेक दिवसांपासून तरूणीचा पाठलाग करून छेडखानी करीत होता. तिने अनेकवेळा तिला समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रकार सुरूच होता.
मंगळवारी सकाळी वरुडच्या एका महाविद्यालयात जलालखेडा ते वरुड एसटीने येत असताना आरोपी युवकाने दुपारी दीड वाजताच्या दरम्यान पुन्हा तरूणीला त्रास देण्यास सुरूवात केली. तरुणीने तिच्या काकाला बोलावून घेतले.
काकाने पोलिसांना माहिती देवून वरुड बसस्थानकावर पाचारण केले. यावेळी सख्याहरीला ताब्यात घेवून पीडित विद्यार्थिनीच्या जबानी फिर्यादीवरुन ठाणेदार गोरख दिवे यांच्या मार्गदर्शनाखाली वरुड पोलिसांनी सख्याहरी हर्षल घनश्याम सातपुते विरूद्ध भादंविचे कलम ३५४(अ) अन्वये गुन्हा दाखल करुन प्रकरण नरखेड पोलिसांकडे वळते केले आहे. मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याने विद्यार्थिनी कंटाळली होती. त्यामुळे तिने पोलिसांत तक्रार नोंदविली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Strikers arrested for harassing students