प्रहारचा सीईओंच्या दालनात तीन तास ठिय्या
By Admin | Updated: July 7, 2015 00:22 IST2015-07-07T00:22:37+5:302015-07-07T00:22:37+5:30
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखेतर्फे मागील २८ जूनपासून अंजनगाव बारी येथील ग्रामसेवक एन. आर. पतालिया..

प्रहारचा सीईओंच्या दालनात तीन तास ठिय्या
आंदोलन : लेखी आश्वासनानंतर आंदोलकांची माघार
अमरावती : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखेतर्फे मागील २८ जूनपासून अंजनगाव बारी येथील ग्रामसेवक एन. आर. पतालिया यांच्या वरील निलंबन कारवाई रद्द करावी आणि इतर मागण्यांसाठी ग्रामपंचायतीमध्ये कामबंद आंदोलन सुरू केले आहे. याविरोधात सोमवारी प्रहारने जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांच्या दालनात तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन केले. अखेर सीईओंनी कारवाईचे लेखी आश्र्वासन दिल्याने सदर आंदोलन निवळले.
जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी मागील एक आठवड्यापासून पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांची यामुळे गैरसोय होत आहे. यावर जिल्हा परिषद प्रशासन आणि पंचायत समिती स्तरावर ग्रामसेवकांच्या नियम बाह्य आंदोलना विरोधात कुठलीही कारवाई केली नाही . अखेर आंदोलन कर्त्यांच्या तीव्र भावना लक्षात घेता सीईओंनी लेखी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन निवडले. आंदोलनात छोटू महाराज वसू, जोगेंद्र मोहोड, गजानन भूगोल, चंदू खेडकर, गुडू कुचे, नितीन लाडीवकर, रविकांत वाकोडे, देवानंद केवले, प्रवीण जठाळ, गोपाल फुकटकर, मोहन साबळे, मंगेश कडू, भाष्कर उके समावेश होता.