मूकबधिर विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्यास कठोर शिक्षा करा

By Admin | Updated: October 4, 2016 00:24 IST2016-10-04T00:24:23+5:302016-10-04T00:24:23+5:30

अपंग, मूकबधिर, अंध, युवती विद्यार्थिनी, महिलांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन मानसिक विकृती असणारे ...

Strict punishment is given to those who are abusive against the teacher | मूकबधिर विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्यास कठोर शिक्षा करा

मूकबधिर विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्यास कठोर शिक्षा करा

निवेदन : अपंग कर्मचारी संघटनेची मागणी
मोर्शी : अपंग, मूकबधिर, अंध, युवती विद्यार्थिनी, महिलांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन मानसिक विकृती असणारे नराधमांकडून त्यांच्यावर बलात्कार, लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत आहेत.
मूकबधिर विद्यार्थिनीसोबत अशीच घटना अमरावती व अहमदनगर येथे नुकतीच घडली. अशा घटना वारंवार होऊ नये, अपंग विद्यार्थ्यांना सुरक्षित राहता यावे, त्यांना संरक्षण मिळावे यादृष्टीने महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना जिल्हा शाखा अमरावतीच्यावतीने अध्यक्ष राजेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वात सर्वश्री दिलीप वसू, दिपेश वानखडे, अरुण यावले, दिलीप तानोळकर, प्रवीण वानखडे, रमेश गाडगे, राऊत, भगवंत गजभिये इत्यादींचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांची भेट घेऊन मूकबधिर, अंध, अपंग यांच्यावर लैंगिक अत्याचार, बलात्कार करणाऱ्या नराधमास कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Strict punishment is given to those who are abusive against the teacher