लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी, ३५७ वाहन चालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:16 IST2021-03-01T04:16:07+5:302021-03-01T04:16:07+5:30
कॅप्शन - अमरावती येथे लॉकडाऊनदरम्यान राजकमल चौकात पोलिसांनी रात्री वाहनांवर कारवाई केली. ६५ हजारांचा दंड : ४३ जणांविरुद्ध नोंदविला ...

लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी, ३५७ वाहन चालकांवर कारवाई
कॅप्शन - अमरावती येथे लॉकडाऊनदरम्यान राजकमल चौकात पोलिसांनी रात्री वाहनांवर कारवाई केली.
६५ हजारांचा दंड : ४३ जणांविरुद्ध नोंदविला गुन्हा
अमरावती: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्या अनुषंगाने शहर पोलिसांनी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करीत रविवारी ३५७ जणांवर दंडात्मक कारवाई करून वाहनचालकांकडून ६४ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विनामास्क फिरणाऱ्यांवर ३५, तर संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सात अशा ४१ जणांविरुद्ध भादंविचे कलम १८८ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. आतापर्यंत ६०६ जणांविरुद्ध भादंविचे कलम १८८ अन्वये पोलिसांनी तीन आठवड्यांत गुन्हे नोंदविले. लाखो रुपयांना दंड वसूल करण्यात आल्या. अनेकांच्या दुचाकी पोलिसांनी डिटेन केल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.